Home

जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबसाठी ग्राफिक डिझाईन : परिसंवाद आणि कार्यशाळा
जाहिरातदार, फोटोग्राफर्स, प्रिंटर्स, कलाशिक्षक, आर्ट स्कूल स्टुडंट्स, व्यावसायिक, नोकरदार, डिप्लोमा / डिग्री होल्डर, आणि ग्राफिक डिझाईनमधील नवोदित व्यावसायिकांसाठी शिवाय ज्यांना जाहिरात, प्रिंटिंग आणि वेब क्षेत्रात ग्राफिक डिझाईनर बनायचे आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. आदी सर्वांसाठी सर्व शंका दूर करणारा मराठी परिसंवाद…

ग्राफिक डिझाईन म्हणजे कमर्शिअल आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे फाईन आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे कम्युनिकेशन आर्ट आणि ग्राफिक डिझाईन म्हणजेच अप्लाईड आर्ट. टूडी / थ्रीडी अॅनिमेशन म्हणजे हालतं बोलतं ग्राफिक डिझाईन आणि त्या अॅनिमेशनमधील प्रत्येक फ्रेम म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. कॉम्प्युटर आणि इंटरनेट नव्हते तेंव्हाही ग्राफिक डिझाईन होतंच. पेन्सिलने कोऱ्या पेपरवर ड्रॉ केलेली एक रेष किंवा ड्रॉ केलेला एक आकार आणि त्या आकारात रंग भरून काढलेले एक चित्र म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. एखाद्या आर्टिस्टने कॅनव्हासवर तैलरंगात केलेले पेंटिंग किंवा फोटोग्राफरने काढलेला फोटो म्हणजे सुद्धा ग्राफिक डिझाईनच असते. आत्ताच्या इंटरनेट युगातील युझर इंटरफेस (UI) आणि युझर एक्स्पेरियन्स (UX) डिझाईन ज्याचा खूप गाजावाजा चाललाय तेही ग्राफिक डिझाईनच असते. थोडक्यात ज्याद्वारे एखादा संदेश दिला जातो अशी कोणतीही कलाकृती म्हणजे ग्राफिक डिझाईन. काळानुसार बदलेली संदेशवहनाची माध्यमे आणि त्या मध्यामानुरूप अर्थ समजण्याच्या दृष्टीने शब्द बदलले पण या साऱ्या शब्दांपाठीमागील मतितार्थ आणि संकल्पना एकच आहे, आणि ती म्हणजे ‘ग्राफिक डिझाईन’. तेंव्हा ग्राफिक डिझाईनच्या विविध नावांमुळे आणि विविध माध्यमांमुळे गोंधळून जायचे कारण नाही. पुढे वाचा
मर्यादित सीट्स असल्याने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच रजिस्टर करा.

Register Now

Already Joined 6 others!

Tribe Loading Animation Image

प्रवेश शुल्क रु. 2000/- असून ते ऑनलाईन नेट बँकिंग / डेबिट कार्ड / क्रेडीट कार्डद्वारे भरण्यासाठी येथे क्लिक करा किंवा बँक ट्रान्सफर किंवा रोख किंवा चेकनेही देऊ शकता.