‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’
(Graphic Design Skills)
जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमध्ये ‘प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर’ म्हणून करिअर करा.
ब्लॉगच्या माध्यमातून मी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्समधील लेसन्स प्रसिध्द करित असतो. त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पैकी काहीनी ऑनलाईन बॅचसाठी प्रवेश घेतला आहे तर काहींनी जी.डी.स्किल्स कोर्सबद्दल आणि ग्राफिक डिझाईनमधील करिअरविषयक काही प्रश्नही विचारले आहेत. ग्राफिक डिझाईनसंबंधी विचारलेल्या सर्वसाधारण खालील प्रश्नांवर आधारित लिहिलेला हा शंका निरसनपर लेख तुमच्या ग्राफिक डिझाईनविषयी शंका दूर करण्यास नक्की मदत करेलच, शिवाय हा मराठी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स जगातील इतर कोणत्याही इंग्रजीतील नुसत्या ग्राफिक डिझाईन कोर्सपेक्षा एकदम सोपा आणि वेगळा कसा आहे, हे सहजच लक्षात येईल.
01. ग्राफिक डिझाईन आणि वेब डिझाईनमध्ये फरक काय?
02. लोगो डिझाईन कसे करतात?
03. आपण UI आणि UX डिझाईन शिकविता का?
04. मला वेब डिझाईन शिकायचे आहे. कोणता कोर्स करू?
05. मला ज्वेलरी डिझाईन शिकायचे आहे. आपण शिकवता का?
06. मला व्हिडीओ मेकिंगची आवड आहे. मी कोणता कोर्स करू?
07. कोर्स केल्यावर आपण नोकरीची हमी देता का?
08. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
09. सोशल नेटवर्किंग अॅडस कशा बनवितात?
10. प्रिंटिंगसाठी डिझाईन कसे बनवितात?
11. बॉक्स किंवा पौचसाठी डिझाईन कसे आणि कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये बनवितात?
12. मोठ्या होर्डिंगचे डिझाईन कसे बनवितात?
13. फॅशन डिझाईन म्हणजे काय?
14. फ्लेक्स प्रिंटिंगसाठी डिझाईन कसे करतात?
15. फोटोग्राफीचा कोर्स कुठे करावा?
16. जाहिरातीचे डिझाईन कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये बनते?
17. कोरल ड्रॉ आणि इलस्ट्रेटरमध्ये फरक काय?
18. पब्लिकेशनसाठी इनडिझाईन सॉफ्टवेअरच का वापरतात? कोरल ड्रॉ का नाही?
19. कमर्शिअल आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझाईनरमध्ये फरक काय?
20. गेमिंग डिझाईन म्हणजे काय?
21. आपण अॅनिमेशन शिकविता का?
22. व्ही.एफ.एक्स. म्हणजे नेमके काय? इ. इ. इ.
विचारलेल्या वरील सर्व प्रश्नांच्या मुळाशी गेल्यावर थोडक्यात एकच उत्तर सापडते, ते म्हणजे ‘ग्राफिक डिझाईन’. कारण असे कि, वरील सर्व प्रश्नांशी संबंधित ग्राफिक डिझाईन हा कॉमन आणि मूळ विषय आहे. प्रिंटिंग, पॅकॅजिंग, वेब डिझाईन, टूडी / थ्रीडी अॅनिमेशन, गेमिंग, फॅशन डिझाईन, फोटोग्राफी, ज्वेलरी डिझाईन, व्हिडीओ मेकिंग, किंवा डिझाईन संबंधित कोणत्याही कोर्सला जा. तिथे ग्राफिक डिझाईन हा विषय असतोच. तो तुम्हाला किती आणि कसा समजतो यावर पुढे सारे अवलंबून असते. ग्राफिक डिझाईन हा केवळ विषय नाही तर ती एक दृष्टी आहे. विविध माध्यमातून तिला साकार करायचे असते. एवढे समजले तरी ग्राफिक डिझाईनसंबंधित इतर विषय समजायला वेळ लागत नाही आणि शंकाही निर्माण होणार नाहीत. नोकरीची हमी मिळते किंवा या क्षेत्रात पैसे भरपूर मिळतात अशा संकुचित वृत्तीने हे क्षेत्र निवडू नका. तुम्हाला खरंच कलेची आवड असेल आणि ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ अवगत करुन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ग्राफिक डिझाईन क्षेत्र अवश्य निवडू शकता.
सॉफ्टवेअर्स :
ग्राफिक डिझाईनमध्ये सॉफ्टवेअर्सचा खूपच गोंधळ आहे. ज्याला जे सॉफ्टवेअर येते, तो त्याचे कौतुक करतो. पण एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन सॉफ्टवेअर्सपैकी कोणते सॉफ्टवेअर चांगले? याचे उत्तर देणे कठीण आहे. मी म्हणेन ज्याला ग्राफिक डिझाईनची दृष्टी आहे, त्याला कोणतेही सॉफ्टवेअर चालते. तुम्हाला कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर आणि फोटोशॉपसह बाकी इतर सॉफ्टवेअर्सही शिकायची आहेत. पण ही सॉफ्टवेअर्स ग्राफिक डिझाईनच्या दृष्टीने शिकणे हा महत्वाचा मुद्दा आहे, हे समजून घ्या म्हणजे वरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआपच मिळू लागतील. दहा सॉफ्टवेअर्स शिकलो पण काम एकही जमत नसेल तर ती सॉफ्टवेअर्स शिकून उपयोग काय? सॉफ्टवेअर कोणीही शिकू शकतो. त्यासाठी क्लासला जायचीही गरज नाही. घरबसल्या इंटरनेटवर तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर अगदी आरामात शिकू शकता. डेमो पाहून तेवढा टॉपिक समजू शकतो. पण स्किल्स मात्र नियमित प्रॅक्टिकल अभ्यासाने आत्मसात करायला लागतात. त्यासाठी नुसते सॉफ्टवेअर शिकविणाऱ्या क्लासमध्ये जाऊन चालणार नाही. तर ‘सॉफ्टवेअर स्किल्स’ शिकवितात का ते पाहून क्लास निवडला पाहिजे. आर्ट स्कूल्समध्ये ग्राफिक डिझाईनची दृष्टी निर्माण करण्याचे काम करतात. पण अभ्यासक्रमात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी नसल्याने सॉफ्टवेअर स्किल्समध्ये विद्यार्थी कमी पडतात. ही वस्तुस्थिती आहे.
आणखी एका प्रश्नामध्ये UI आणि UX डिझाईनबद्दल शंका विचारली आहे. वेब डिझाईनमध्ये युझर इंटरफेस डिझाईन (UID) आणि युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन (UXD) या दोन संकल्पना नव्याने उदयास आल्या आहेत. अर्थात या संकल्पना म्हणजे ग्राफिक डिझाईन / वेब डिझाईनच असते. पण नवीन शब्द प्रयोगामुळे समजण्यात गोंधळ होतो. कोणतीही गोष्ट दिसायला वरून साधी, सुंदर म्हणजेच युझर इंटरफेस डिझाईन आणि आतून सुटसुटीत, आरामदायी तांत्रिक रचना म्हणजे युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन. समजून घ्यायचेच झाले तर गाडी दिसायला कशी वाटते म्हणजे युझर इंटरफेस डिझाईन आणि ज्यामुळे गाडी वापरायला कशी वाटते म्हणजे युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन. म्हणजेच एखादे अॅप कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर कसे दिसते म्हणजे युझर इंटरफेस डिझाईन आणि अंतर्गत फंक्शन / कोडिंग स्ट्रक्चरमुळे वापरायला कसे वाटते म्हणजे युझर एक्स्पेरिअन्स डिझाईन. एंड युझरच्या दृष्टीने इथे सारा विचार केला जातो.
कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूच्या किंवा सेवेच्या जाहिराती, प्रिंटिंग किंवा पॅकॅजिंगसाठी एंड युझरचाच विचार करून डिझाईन्स बनविली जातात. म्हणजे युझर इंटरफेस डिझाईन आणि युझर एक्स्पेरिअन्स डिझाईनमध्ये नवीन काहीच नाही. वेब डिझाईनसंदर्भातच या संकल्पना वापरतात.
फोटोग्राफी हे एक खूप मोठे क्षेत्र आहे, आणि फोटोग्राफी हासुद्धा ग्राफिक डिझाईनचाच एक विषय आहे. ग्राफिक डिझाईनच्या विषयानुरुप फोटो शूट करणे हे एक फार मोठे कौशल्य असते. फोटो काढताना सेट करावी लागणारी फ्रेम म्हणजे ग्राफिक डिझाईनचाच एक भाग असतो. कांपोझिशन हा ग्राफिक डिझाईनमधील अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याचा उपयोग फोटोग्राफी करताना होतो. जाहिरातीसाठी टेबल टॉप प्रोडक्ट फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी, आदी गोष्टींचे प्रॅक्टिकल ज्ञान ग्राफिक डिझाईनरला असावयास हवे. कारण जाहिरात डिझाईनमध्ये परफेक्ट फोटोग्राफीला खूप महत्व असते.
ग्राफिक डिझाईनसंबंधित कितीही छोटा टॉपिक अगदी बारकाईने समजून घेऊन शिकावा लागतो. ज्ञान कणाकणानेच मिळवावे लागते. ग्राफिक डिझाईनमधील करिअर इतर क्षेत्रातील करिअरपेक्षा सोपे नक्कीच आहे. कारण इथे नोकरीच्या संधी भरपूर आहेत, आणि केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसायही सुरु करता येतो. ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्ही कितीही शिकलात तरी पुढे शिकण्यासाठी खूप काही शिल्लक राहते. नवीन नवीन कलात्मक शिकण्यातली मजा जेवढी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात आहे तेवढी इतर कोणत्याही क्षेत्रात नाही. म्हणूनच ग्राफिक डिझाईनर कधी बेकार राहत नाही. कारण प्रत्येक क्षेत्रात नेहमी त्याची गरज असतेच. हे ग्राफिक डिझाईनमधील करिअरचे वैशिष्ट्य आहे.
ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?
लाईन्स, शेप्स, कलर्स, इमेजिस आणि टेक्स्ट यांची आकर्षक रचना म्हणजे ग्राफिक डिझाईन असले तरी त्यापाठीमागे असलेल्या ऑब्झर्वेशन, थिंकिंग, स्केचिंग, इमॅजिनेशन, रायटिंग आदी गोष्टींना अधिक महत्व असते. म्हणून या गोष्टी आत्मसात करणे आम्ही महत्वाचे समजतो.
ग्राफिक डिझाईन म्हणजे कमर्शिअल आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे फाईन आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे कम्युनिकेशन आर्ट आणि ग्राफिक डिझाईन म्हणजेच अप्लाईड आर्ट. टूडी / थ्रीडी अॅनिमेशन म्हणजे हालतं बोलतं ग्राफिक डिझाईन आणि त्या अॅनिमेशनमधील प्रत्येक फ्रेम म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. कॉम्प्युटर आणि इंटरनेट नव्हते तेंव्हाही ग्राफिक डिझाईन होतंच. पेन्सिलने कोऱ्या पेपरवर ड्रॉ केलेली एक रेष किंवा ड्रॉ केलेला एक आकार आणि त्या आकारात रंग भरून काढलेले एक चित्र म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. एखाद्या आर्टिस्टने कॅनव्हासवर तैलरंगात केलेले पेंटिंग किंवा फोटोग्राफरने काढलेला फोटो म्हणजे सुद्धा ग्राफिक डिझाईनच असते. आत्ताच्या इंटरनेट युगातील युझर इंटरफेस (UI) आणि युझर एक्स्पेरियन्स (UX) डिझाईन ज्याचा खूप गाजावाजा चाललाय तेही ग्राफिक डिझाईनच असते. थोडक्यात ज्याद्वारे एखादा संदेश दिला जातो अशी कोणतीही कलाकृती म्हणजे ग्राफिक डिझाईन. काळानुसार बदलेली संदेशवहनाची माध्यमे आणि त्या मध्यामानुरूप अर्थ समजण्याच्या दृष्टीने शब्द बदलले पण या साऱ्या शब्दांपाठीमागील मतितार्थ आणि संकल्पना एकच आहे, आणि ती म्हणजे ‘ग्राफिक डिझाईन’. तेंव्हा ग्राफिक डिझाईनच्या विविध नावांमुळे आणि विविध माध्यमांमुळे गोंधळून जायचे कारण नाही.
तुम्ही थोडाफार विचार करू शकत असाल, जाता येता निरीक्षण करित असाल, कधीतरी पेन्सीलने कागदावर रेघोट्या मारल्या असतील, काही लिहिले असेल आणि जर रेड, ग्रीन, ब्लू, येलो, ऑरेंज, आदी कलर्स तुम्हाला ओळखता येत असतील तर तुम्ही परफेक्ट ग्राफिक डिझाईनर बनू शकता. स्वत:चा व्यवसाय सुरु करू शकता.
ग्राफिक डिझाईनर – एक व्यावसायिक गरज :
कोणत्याही व्यवसायाच्या / प्रोडक्टच्या अॅडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी अनेक प्रकारची ग्राफिक डिझाइन्स बनवावी लागतात. त्याला ब्रँडिंग असेही म्हणतात. त्यामध्ये लोगो डिझाईन, कार्पोरेट आय.डी., स्टेशनरी, ब्रोशर, कॅटलॉग डिझाईन, फोटोग्राफी, ईमेज एडिटिंग, स्टिकर, पोस्टर, होर्डिंग डिझाईन, बॉक्स पॅकॅजिंग, पौच पॅकॅजिंग, न्यूज पेपर अॅड, मॅगॅझिन अॅड, तसेच वेबसाईट डिझाईन, ब्लॉग डिझाईन, ईमेल मार्केटिंगसाठी ईमेल डिझाईन, सोशल नेटवर्क मार्केटिंगमध्ये फेसबुक, जी प्लस, ट्विटर, लिंक्ड इन आदी पोस्टसाठी ग्राफिक डिझाईन, युट्युब चॅनलसाठी ग्राफिक व्हिडीओ आदी अनेक गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी समजून घेऊन जो डिझाईन करतो तो ‘ग्राफिक डिझाईनर’.
ग्राफिक डिझाईनमधील करिअर आणि प्रचलित शिक्षण :
करीयरच्या दृष्टीने जेंव्हा ग्राफिक डिझाईनचा विचार केला जातो तेंव्हा ग्राफिक डिझाईनमध्ये नेमके काय शिकायचे आणि शिकायला सुरुवात कोठून करायची हा प्रश्न पडतोच. ग्राफिक डिझाईन हा खूप मोठा आणि विस्तृत विषय आहे. म्हटले तर हा तसा खूप अवघड आणि समजून घेतला तर एकदम सोपा विषय आहे. ग्राफिक डिझाईनचे विविध प्रकार पाहिले कि त्याचे मूळ रूप नेमके कसे आहे ते कळत नाही. ग्राफिक डिझाईनमध्ये जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग, पब्लिकेशन, वेब डिझाईन, अॅनिमेशन आणि या प्रत्येकामध्ये परत बरेच उपप्रकार पडतात. त्यापैकी कोणत्याही एका विषयात स्पेशलायझेशन करून करियरला संधी असते. ग्राफिक डिझाईन कुणी शिकावं? ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी काय पात्रता हवी? ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी चित्रकलेची गरज आहे का? ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर काय? या व अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे हवी असतात. कोर्सला भरलेल्या फीच्या बदल्यात विद्यार्थ्याला काय मिळते? नुसते सर्टिफिकेट म्हणजे ज्ञानाची पावती किंवा कौशल्य विकास नव्हे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली शिक्षण पद्धती. डिप्लोमा / डिग्रीचे सर्टिफिकेट म्हणजे ज्ञानाची पातळी समजली जाते. पण सत्य परिस्थिती पाहिली तर त्या डिप्लोमा / डिग्री सर्टिफिकेटचा आणि ज्ञानाचा दुरान्वये कुठेच संबंध दिसत नाही. शिक्षण ज्ञान मिळविण्यासाठी आहे कि सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कळत नाही. अभ्यास पास होण्यासाठी आणि सर्टिफिकेट नोकरी मिळण्यासाठीच मिळवायचे असे जणू समीकरणच झाले आहे. मात्र व्यवसाय करावा असे फार कमी विद्यार्थ्यांना वाटते. असे मुळीच नाही कि व्यवसाय डिप्लोमा / डिग्री झाल्यानंतरच करता येतो. नोकरीसाठी डिप्लोमा / डिग्री ठीक आहे. पण व्यवसाय करण्यासाठी प्रॅक्टिकल व्यावसायिक ज्ञानाची गरज असते. आणि हेच आम्ही या ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्समध्ये शिकवितो.
कोणत्याही शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रचलित थेअरीबाज शिक्षण कुचकामी ठरले आहे. परीक्षा पध्दतीतर त्याहून चुकीची आहे. वर्षाच्या शेवटी घाईगडबडीत कसेबसे ओढून ताणून प्रोजेक्ट संम्मीशन करायचे म्हणजे पाट्या टाकण्यापेक्षा वेगळे काय आहे? एक गोष्ट दहा वेळा वाचून पाठ करण्यापेक्षा ती गोष्ट एकदा प्रत्यक्ष करून पाहिली कि जास्त समजते. म्हणून आम्ही म्हणतो वाचून पाठ करण्यापेक्षा प्रत्यक्ष करून बघा. प्रचलित थेअरीबाज शिक्षण म्हणजे पुस्तक वाचून पोहायला शिकल्यासारखे किंवा एखाद्या खाद्यपदार्थाचे वर्णन वाचून पोट भरल्यासारखे आहे. म्हणून आम्ही 100 टक्के प्रॅक्टिकलला महत्व देतो. आज मार्केटमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरुन ग्राफिक डिझाईन्स बनवितात तीच टेक्नॉलॉजी आम्ही शिकवितो.
100 टक्के नोकरीची नव्हे तर ज्ञानाची हमी :
100 टक्के नोकरीची हमी ही एक खूप आकर्षक पण बुद्धीला न पटणारी संकल्पना कशी रूढ झाली आहे माहित नाही. खरे तर 100 टक्के ज्ञानाची हमी पाहिजे. कारण 100 टक्के ज्ञान असेल तरच तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय काहीही करू शकता. म्हणून शिकणाऱ्याने 100 टक्के नोकरीच्या अमिषाला बळी न पडता 100 टक्के ज्ञानाची हमी मागितली पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. म्हणूनच विद्यार्थ्याला आम्ही 100 टक्के ज्ञानाची आणि 100 टक्के पैसे कमवायची गॅरंटी नक्कीच देतो.
ग्राफिक डिझाईन आणि इंटरनेट :
इंटरनेटवर ग्राफिक डिझाईनबद्दल इंग्रजीमध्ये खूप काही वाचायला मिळतं, खूप काही मोफत शिकायला मिळतं आणि नवनवीन संकल्पना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ग्राफिक डिझाईन करताना इंटरनेटचा रेफरन्ससाठी खूपच उपयोग होतो. इंटरनेटमुळे ग्राफिक डिझाईनर बनणे अधिक सोपे झाले आहे. बहुतांश कोर्सेसच्या नोटस आणि व्हिडीओज इंटरनेटवरूनच डाउनलोड करून विद्यार्थ्याला दिल्या जातात. इंटरनेट म्हणजे कोणताही विषय शिकण्याचे उघड गुपित आहे. इंटरनेट सर्वांनाच माहित आहे. त्याचा उपयोग ग्राफिक डिझाईनसाठी कसा होतो याचाही या कोर्समध्ये आम्ही आवर्जुन समावेश केला आहे.
ग्राफिक डिझाईन एवढं सोपं कसं असू शकतं?
ग्राफिक डिझाईन ही सहज समजण्यासारखी एक अत्यंत सोपी आणि साधी संकल्पना आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे फार काहीतरी वेगळे आहे. अद्भुत आहे, अवघड आहे असे मुळीच नाही. ग्राफिक डिझाईन करण्यासाठी स्वतः आर्टिस्ट असावे लागते असेही नाही. इंटरनेटच्या युगात जरी आता सारे एकदम सोपे आणि सुटसुटीत झाले असले तरीही गुंतागुंत वाढली आहे. कारण काय खरे, काय खोटे, कोणते बरोबर आणि कोणते चूक हे समजून घेताना संभ्रम होतो. ग्राफिक डिझाईनच्या बाबतीतही असेच झाले आहे. जाहिरात आणि जाहिरातीच्या विविध माध्यमांमुळे ग्राफिक डिझाईनचे रोज नव-नवीन प्रकार पाहायला मिळतात. प्रमोशनसाठी प्रत्येक व्यावसायिकाला आज ग्राफिक डिझाईनची गरज आहे. त्यामुळे जसजसा उद्योग वाढतो आहे, तसतसे ग्राफिक डिझाईनचे महत्व वाढतच आहे. ग्राफिक डिझाईनरला नेहमीच काही तरी नवीन करावे लागते. माध्यमाला अनुसरून असे क्रिएटिव्ह आर्टवर्क बनविताना वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामध्ये ऑफसेट प्रिंटिंगला डिझाईन आर्टवर्क करण्याची पद्धत वेगळी, बुक पब्लिकेशनसाठी आर्ट-वर्क करण्याची पद्धत वेगळी तसेच स्क्रिन प्रिंटिंगसाठी डिझाईन आर्टवर्क करण्याची पद्धत वेगळी असते. डिजिटल प्रिंटिंग, पॅकॅजिंगमध्ये फ्लेक्झो किंवा रोटो-ग्रेव्हीयरसाठीही डिझाईन आर्टवर्क करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. इंटरनेटसाठी स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट डिझाईन बनवताना तर HTML, CSS, JS, PHP, MySQL, अशा विविध प्रकारच्या प्रॉग्रॅमिंग माध्यमातून जावे लागते. रिस्पॉन्सिव्ह वेबसाईटसाठी पुन्हा बूट-स्ट्रॅप सारख्या प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागतो. ब्लॉगिंगसाठी कधी ब्लॉगर तर कधी वर्ड-प्रेस वापरावे लागते. ऑनलाईन जाहिरातीसाठी डिझाईन्स बनविणे हा पुन्हा वेगळा प्रकार असतो. फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर आदी सोशल नेट्वर्किंग प्रमोशनसाठी पेज डिझाइन्स बनविणे ही सुद्धा एक कसरत असते. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये ईमेलसाठीसुध्दा विशिष्ट प्रकारे डिझाईन करावे लागते. अशा अनेक प्रकारच्या ग्राफिक डिझाईनची कामे करताना ग्राफिक डिझाईनरला वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरावी लागतात. मग कोणत्या डिझाईनसाठी नेमके कोणते सॉफ्टवेअर वापरायचे? हा पुन्हा पेचात टाकणारा प्रश्न असतो. ग्राफिक डिझाईनची व्याप्ती आणि ग्राफिक डिझाईनरच्या कामाची लिस्ट अजूनही खूप मोठी आहे. इथे एका वेळी ते सर्व सांगणे शक्य नाही.
विविध क्षेत्रातील ग्राफिक डिझाईनचे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आर्टेकचा विद्यार्थी कसा करू शकतो? हे आजवर इतरांना न उलगडलेले कोडे आहे.
अनेक माध्यमे, अनेक डिझाईन्सचे प्रकार, डिझाईन करण्याच्या अनेक पद्धती तरीही ग्राफिक डिझाईन ही एक अत्यंत सोपी आणि साधी संकल्पना आहे आणि तुम्हीसुद्धा ग्राफिक डिझाईनर बनू शकता हे आम्ही ठामपणे सांगतो कारण हा नुसता ग्राफिक डिझाईन कोर्स नाही तर हा ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स आहे.
ह्या कोर्ससाठी काय पात्रता हवी?
हा कोर्स पूर्ण करुन स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी नवीन शिकण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि ठाम निर्णयक्षमता या दोनच पात्रता असायला हव्यात. पास, नापास किंवा मार्क्सची टक्केवारी आम्हाला महत्वाची नाही. किंबहुना पडलेल्या मार्क्सवर विद्यार्थ्याचे मुल्यमापन करणे आम्हाला पटत नाही.
तुम्हाला ड्रॉइंगची आवड असेल आणि जाहिरात / प्रिंटिंग / वेब क्षेत्रात ग्राफिक डिझाईनर बनायची इच्छा असेल. शिक्षण जेमतेम असेल किंवा पदवीधर असुनही नोकरी मिळत नसेल. तुम्ही प्रोग्रॅमर असाल पण ग्राफिक डिझाईन जमत नसेल. तुम्ही जी.डी.आर्ट असाल आणि कल्पनेतील डिझाईनचे विज्युअल बनविता येत नसेल. वर्षानुवर्षे शिकुनही अजून बेकार असाल, तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे किंवा इतर काहीही शिकत असाल तर शिकत शिकत शिकण्यासारखा हा कोर्स तुमच्यासाठीही आहे.
तुम्ही आर्टिस्ट असाल, तुम्ही फोटोग्राफर असाल, प्रिंटर असाल, जाहिरातदार असाल आणि ग्राफिक डिझाईनमधील आणखी काही स्पेशल शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीसुध्दा आहे.
प्रवेशासाठी ना वयाची अट, ना शिक्षणाची अट. कारण ग्राफिक डिझाईन ही सहज समजण्यासारखी एक अत्यंत सोपी आणि साधी संकल्पना आहे.
नोकरीचे अमिष नाही. फी मध्ये सूट नाही, वर्षात स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवा आणि निश्चिंतपणे प्रवेश घ्या. कोर्स पुर्ण होईपर्यंत तुमच्यात व्यवसाय सुरु करण्य़ाची पात्रता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आमची.
कोर्स मटेरियल :
एक लॅपटॉप, हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, स्केच बुक, पेन्सिल, एक नोटबुक, डेली डायरी आणि पेन.
कोर्स कालावधी : 1 वर्ष,
प्रत्येकी एक महिन्यांचे शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध .
मोफत माहितीपत्रकासाठी 9371102678 किंवा 9975769299 या नंबरला व्हाट्सअप करा. टाईप करा. फक्त GDS
आर्टेक डिजिटल,
SN. 28, Kaushik, Raghav Nagar, Near Bharati Hospital,
Dhankawadi, Pune – 411043
मोबाईल : 9975769299,
ईमेल : gd@artekdigital.in
वेब साईट : https://artekdigital.in

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.