वर्षात कमवायला शिकविणारा आर्टेकचा ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स नक्की कोणासाठी आहे?

नमस्कार,
आर्टेक डिजिटलच्या ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून मी भागवत पवार.
मी नेहमीच म्हणतो कि ग्राफिक डिझाईन आणि ग्राफिक डिझाईनमधील करिअर खूप सोपं आहे. 10वी / 12वी किंवा पदवीनंतर कुणीही हा कोर्स करून नोकरी किंवा व्यवसाय काहीही करू शकतो.

मित्रानो, भरमसाठ फी मोजून वर्षानुवर्षे शिकून तुम्ही एखादी डिग्री घेतली असेल पण अजूनही जर नोकरीसाठी चकरा मारत असाल. मनासारखी नोकरी मिळत नसेल, आणि जे शिकलात त्याच्या आधारे व्यवसाय करता येत नसेल, घरातून पैसे कमवायचा तगादा लागला असेल किंवा पैसे कमवायला पाहिजे अशी तुम्हाला जाणीव झाली असेल. तर मी सांगतो नोकरीचा नाद सोडा. हा कोर्स तुमच्यासाठीच आहे. ग्राफिक डिझाईन शिका आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करा.

तुम्हाला चित्रकलेची आवड असेल, चित्रे काढण्यात, ती रंगविण्यात आनंद वाटत असेल, तुम्हाला लिहायला आवडत असेल, वाचायला आवडत असेल, विचार करून एखादे कोडे सोडवायला आवडत असेल, आजूबाजूच्या सुंदर गोष्टी तुम्हाला आवडत असतील, तुमच्याकडे खूप आयडिया आहेत, म्हणजे तुम्हाला जर वेगवेगळ्या कल्पना सुचत असतील, तर हा कोर्स नक्कीच तुमच्यासाठी आहे.

तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, एखादे दृश्य पाहिल्यावर तुम्हाला फोटो काढण्याचा मोह होत असेल, प्रासंगिक व्हिडीओ बनवत असाल. तर हा कोर्स तुमच्यासाठी आहेच आहे. कारण असं कि, ग्राफिक डिझाईनसाठी लागणारा कॅमेरा आतातर तुमच्या मुठीत असतो.

ग्राफिक डिझाईनमध्ये नवीन काहीच नाही. ग्राफिक डिझाईनसाठी जे लागतं ते सारं तुमच्या जवळच असतं. तुमच्या आजूबाजूला असतं. तुमच्या परिचयाचं असतं. तुमच्या दिनचर्येतीलच असतं. म्हणजे विचार करा ग्राफिक डिझाईन अवघड कसं असू शकेल? कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर हे फक्त ग्राफिक डिझाईन बनवायचं टूल आहे. ग्राफिक डिझाईन अगोदर डोक्यात बनतं, आणि ते फक्त तुम्हालाच दिसत असतं. दुसऱ्याला दिसण्यासाठी तुम्हाला ते कॉम्प्युटरवर बनवावं लागतं. म्हणजे तुमच्या लक्षात आले का पाहा, तुम्ही जर कल्पना करत असाल, काल्पनिक चित्रे रंगवत असाल, तर ग्राफिक डिझाईनचा हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.

मित्रानो, ग्राफिक डिझाईन शिकायला खरंच खूप साधं आणि सोपं आहे. ग्राफिक डिझाईन स्किल्स कोर्सचे माहितीपत्रक पाहिजे असेल तर GDS टाईप करा आणि 9371102678 किंवा 9975769299 या नंबरला व्हाट्सअप करा. माहितीपत्रकाची लिंक पाठवू. माहितीपत्रक डाऊनलोड करा, वाचा आणि ठरवा. किंवा काही शंका असल्यास फोन करून 11 ते 5 या वेळेत इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्यक्ष भेटा.

ARTEK DIGITAL,
Graphic Art Training Institute,
S.N. 28, Kaushik, Raghav Nagar,
Near Bharati Hospital, Dhankawadi,
Pune – 411043,
Phone : 020 – 24379299
Email : gd@artekdigital.in

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.