Easy, Simple and Perfect Online Learning : Free Demo Course : Step by Step Guide in Marathi

घरी बसून शिका, सुरक्षित शिका. ऑनलाईन शिका.

ही आजची गोष्ट नाही कि लॉकडाऊन आहे म्हणून आता ऑनलाईन शिकायला सांगतोय. गेल्या कित्येक वर्षांपासून मी सोप्यात सोप्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा शोध घेत होतो कि, जी ऑनलाईन शिकविण्याची पद्धत प्रचलित शिक्षण पद्धतीपेक्षा सोपी, सोयीस्कर आणि विद्यार्थ्यांचे हमखास करिअर घडविणारी असेल. गेल्या 20 वर्षात शेकडो विद्यार्थ्यांनी माझा प्रॅक्टिकल ग्राफिक डिझाईन कोर्स पूर्ण करून स्वतःचं करिअर घडवलं आहे. पण हाच कोर्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नाही. हे मी खूप वर्षांपूर्वी ओळखलं होते. पण कॅमेऱ्यासमोर लेक्चर देऊन किंवा नुसते व्हिडीओ दाखवून खरं ऑनलाईन शिक्षण होणार नाही याची मला पूर्ण जाणीव होती. कारण  यामध्ये विद्यार्थी किती शिकला, त्याला किती समजले आणि प्रत्यक्ष त्याने किती काम केले. हे समजायला हवं. ऑनलाईन शिकत असताना त्याला आलेल्या शंकांचं निरसन कसं होणार? ग्राफिक डिझाईन तर कला आणि कौशल्याचं काम. सारं प्रॅक्टिकलवर आधारित. आणि हे सारं ऑनलाईन आणायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. पण गेली पाच वर्षे सारं सोडून मी हेच करत होतो. आणि शेवटी एक परिपूर्ण ऑनलाईन शिक्षण पद्धती तयार झाली. जी वर्गात बसून  शिकण्यापेक्षा सोपी, सोयीस्कर आणि विद्यार्थ्यांचे हमखास करिअर घडविणारी आहे. 

ग्राफिक डिझाइनच्या ह्या ऑनलाईन कोर्सचे स्वरूप कसे आहे हे समजण्यासाठी मी एक छोटा फ्री डेमो कोर्स बनवला आहे. तो तुम्ही करून पाहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि घरी बसून नुसतं शिक्षण नव्हे तर प्रॅक्टिकल शिक्षण आणि करिअरसुद्धा करता येतं. 

कोर्स मटेरियल :

हा कोर्स करण्यासाठी तुमच्याजवळ इंटरनेट कनेक्शनसाहित एक लॅपटॉप किंवा पीसी हवा. एक LED मॉनिटर, एवढ्यासाठी कि, एका स्क्रिनवर पाहून तुम्ही ह्या दुसऱ्या LED मॉनिटरवर प्रॅक्टिकल करू शकाल. कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. व्हर्जन कोणतेही चालेल. (डेमोसाठी मी CorelDraw X6 आणि Photoshop CS6 वापरले आहे.) वेब-कॅम आणि माईकसह हेडफोन. किमान एवढे कोर्स मटेरियल असेल तर तुम्ही हा डेमो कोर्स पूर्ण करू शकता. हा डेमो कोर्स पूर्ण करून तुम्ही टेस्ट सर्टिफिकेट मिळवले तर तुमची खात्री होईल कि, प्रॅक्टिकलसह ऑनलाईन शिकण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. त्यामुळे लवकरच स्टेप बाय स्टेप सुरु होणारे आमचे ग्राफिक डिझाईन स्किल्स ऑनलाईन मराठी कोर्सेस स्टेप बाय स्टेप पूर्ण करून तुम्ही करिअर घडवू शकता. 

स्टेप 1 : वर सांगितलेल्या कोर्स मटेरियलसह सेटअप  तयार करा.

स्टेप 2 : https://artekdigital.org साईट ओपन करा. आणि फ्री कोर्सच्या Go to Course Page वर क्लिक करा. फ्री कोर्स पेज ओपन होईल.

स्टेप 3 : करंट स्टेटस NOT ENROLLED दिसेल. हा  फ्री कोर्स सुरु करण्यासाठी Login to Enroll बटनवर क्लिक करा. 

स्टेप 4 : Login पेज ओपन होईल. तुम्ही पूर्वी रजिस्टर केले असेल तर लॉगिन व्हा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर Register बटनवर क्लिक करा.

स्टेप 5 : रजिस्टर फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये Username तुमचे पूर्ण नाव टाका. कारण हे नाव तुमच्या सर्टिफिकेटवर येणार आहे.  मी इथे डेमो विद्यार्थ्याचे नाव टाकतो. Student Artek Digital. त्याखाली तुमचा ईमेल टाका.  त्या खाली पासवर्ड दोनदा टाईप करून   I’m not a robot समोरील चेक बॉक्स टिक करा आणि Register बटनवर क्लिक करा.

रजिस्टर झाल्यानंतर नवीन विंडोमध्ये एक मेसेज दिसेल. 

स्टेप 6 : आता तुमचा ईमेल ओपन करा. त्यामध्ये ARTEK DIGITAL कडून Activate Your Account म्हणून एक ईमेल आलेला  दिसेल. तो ओपन करा. आणि त्या ईमेलमधील ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.

स्टेप 7 : तुमचा अकाउंट ऍक्टिव्हेट होईल. Login बटनवर क्लिक करा. Username किंवा Email आणि Password टाकून I’m not a robot समोरील चेक बॉक्स टिक करा आणि Login बटनवर क्लिक करा.

हेडरमध्ये तुमचे नाव दिसेल. तिथून तुम्ही तुमचे प्रोफाईल एडिट करू शकता. तुमचा फोटो अपलोड करू शकता. तुम्ही मला विशिष्ट वेळी माझ्या व्हर्चुअल ऑफिसमध्ये भेटू शकता. प्रश्न विचारू शकता. तुम्ही केंव्हाही तुमच्या ऑनलाईन क्लासरूममध्ये जाऊन शिकू शकता. फोरममध्ये सहभागी होऊन तुमचे मत मांडू शकता, नवीन टॉपिकवर चर्चा करू शकता. 

स्टेप 8  : आता वरील फ्रेममधील फ्री डेमो कोर्सच्या Go to Course Page बटनवर क्लिक करा. 

स्टेप 9 : वरील फ्रेममध्ये करंट स्टेटस NOT ENROLLED  दिसेल. कोर्स सुरु करण्यासाठी Get Started च्या खाली Take This Course बटनवर क्लिक करा. Course Contents खालील  Lessons Activate होतील.  आता तुम्ही Lesson 01 वर क्लिक करा. ऑनलाईन क्लासरूम डिस्प्लेमधील Lesson 01 ओपन होईल. 

ह्या लेसन एकमध्ये फक्त एक इंट्रो व्हिडीओ आहे. तो पाहा आणि Mark Complete बटनवर क्लिक करा. म्हणजे तुम्ही Lesson 01 पूर्ण केला. तम्ही लेसन पूर्ण केल्यावर आम्ही लगेच तुम्हाला तसा ईमेल पाठवतो.  ईमेल चेक करा. Lesson Completed असा ईमेल येईल.  यामध्ये तुम्ही कोणत्या कोर्सचा कोणता लेसन पूर्ण केला त्याचा तपशील असतो.

आता  Lesson 02 ओपन  होईल.

पुढे जाण्यापूर्वी हा ऑनलाईन कलासरूम डिस्प्ले आपण थोडा समजून घेऊ.  

सर्वात वर डाव्या बाजूला संस्थेचे नाव आणि त्याखाली कोर्सचे नाव दिसेल. 

सर्वात वर सेन्टरला प्रोग्रेस बार आहे. यामध्ये विद्यार्थ्याने कोर्समध्ये केलेल्या प्रगतीची टक्केवारी दिसते. जसजसा विद्यार्थी कोर्स पूर्ण करीत जातो. तस तसा हा प्रोग्रेस बार वाढत जातो. आणि कोर्स पूर्ण झाला कि तो 100% होतो. 

आता Lesson 02 ओपन आहे. लेसन 02 मध्ये  थोडी इंट्रोडक्शन आणि त्याखाली तीन टॉपिक्स आहेत. प्रत्येक लेसन्स आणि टॉपिक्स तुम्हाला क्रमशः पूर्ण करायचे आहेत.

स्टेप 10 :  Lesson 02 ओपन  झाल्यानंतर  Topic 02-01 वर क्लिक करा. लेसन किंवा त्यामधील टॉपिकवर क्लिक केल्यास उजवीकडे मोठ्या फ्रेममध्ये  संबंधित व्हिडीओ, त्याखाली प्रॅक्टिकल नोट्स, असाईनमेंट अपलोड कॉलम आदी गोष्टी दिसतील. 

प्रॅक्टिकल व्हिडीओ पाहून आणि नोट्स वाचून त्याप्रमाणे तुम्हाला असाईनमेंट करायची आहे. दिवसभरात कधीही ती असाईनमेंट पूर्ण करून ती Assignment Upload कॉलम मध्ये अपलोड करायची आहे. फायनल कोर्समध्ये तुम्ही प्रॅक्टिकल केलेल्या फाईलची सूचनेप्रमाणे .cdr, .psd किंवा jpg फाईल बनवून ती त्या पेजच्या  शेवटी Assignment कॉलममध्ये अपलोड करायची असते. आत्ता या डेमो कोर्समधील या टॉपिकमध्ये तुम्ही केलेल्या प्रॅक्टिकल फाईलची jpg फाईल बनवून ती Assignment कॉलममध्ये अपलोड करा. 

Jpg फाईल बनवायच्या अगोदर My Online Course नावाचे एक फोल्डर तयार करा. आणि तुमच्या सर्व असाईनमेंटस या फोल्डरमध्ये Save करा. 

[ jpg करण्यासाठी File मेनूमध्ये जावून Export करा, फाईलला शक्यतो टॉपिकचेच नाव द्या (उदा. Topic-02-01.jpg), Save as type – jpg करा आणि Export बटनवर क्लिक करा.]

स्टेप 11 : अपलोड करण्यासाठी Browse बटनवर क्लिक करून तुम्ही तयार केलेली . jpg केलेली फाईल निवडा, Open करा आणि Upload बटनवर क्लिक करा.

तुम्ही असाईनमेंट अपलोड केल्यानंतर पुढचा टॉपिक (Topic 02-02) आपोआप ओपन होईल. तुमची असाईनमेन्ट फाईल आम्हाला मिळेल आणि लगेच असाईनमेंट मिळाल्याचा ईमेलही तुम्हाला मिळेल. कोर्स, टॉपिक डिटेल्स आणि तुम्ही अपलोड केलेल्या असाईनमेंट फाईलची लिंक त्या ईमेलमध्ये असते.

फायनल कोर्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल केलेली कोरल ड्रॉमधील ओरिजिनल .cdr  फाईल पाठवायची असते. तुम्ही अपलोड केलेली असाईनमेंट आम्ही तपासून त्यामध्ये काही चुका असतील, काही करेक्शन्स असतील तर त्याचाही वैयक्तिक ईमेल आम्ही तुम्हाला पाठवतो.

याप्रमाणे ह्या Lesson 02 मधील उरलेले दोन टॉपिक्स पूर्ण करा. असाईनमेंट अपलोड करा. Lesson 02 पेजवरील MARK COMPLETE बटनवर क्लिक करा. 

Lesson 03 पेज ओपन होईल.

Step 12 : Lesson 03 : Photoshop : 

Lesson 02 प्रमाणे Lesson 03 मधील तीन टॉपिक्स क्रमशः पूर्ण  करा. 

फोटोशॉपच्या लेअर फाईलची jpg करण्यासाठी File मेनूमधील Save as… वर क्लिक करा. 

1. My Online Course फोल्डर सिलेक्ट करा. 

2. File Name जो टॉपिक असेल ते द्या (उदा. Topic03-03.jpg)

3. Format JPEG (*.JPG,*.JPEG,*.JPE) सिलेक्ट करा.

4. Save बटनवर क्लिक करा.

समजा तुम्ही टॉपिक 03-01 न करता टॉपिक 03-02 ओपन करून शिकण्याचा प्रयत्न केलात तर एक मेसेज दिसेल – 

Please go back and complete the previous topic. याचा अर्थ एखादा टॉपिक वगळून त्याच्या पुढचा टॉपिक तुम्ही शिकू शकत नाही. मागे जा आणि अगोदरचा टॉपिक पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला कंपलसरी क्रमशः लेसन्स आणि टॉपिक्स पूर्ण करायचे आहेत. त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करून असाईनमेंट पूर्ण करून त्या अपलोड करायच्या आहेत. आणि नंतरच त्यापुढचे लेसन्स आणि टॉपिक्स पूर्ण करायचे आहेत.

फायनल कोर्समध्ये टॉपिक्स असाईनमेंटस शिवाय त्या त्या लेसन्सवर आधारित एक्स्ट्रा डिझाईन वर्क करण्यासाठी दिलेले असते. तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे ते कोर्स कालावधीत पूर्ण करून अपलोड करायचे असते.  

फायनल कोर्समध्ये शिकताना काही शंका असतील तर आर्टेक डिजिटलच्या कोर्स / लेसन संबंधित  फोरममध्ये ती शंका पोस्ट करू शकता. तुमची शंका फोरममध्ये क्लासमधील इतर विद्यार्थीही पाहू शकतात. तुमच्या शंकेचे निरसन टेक्स्ट किंवा व्हिडीओ स्वरूपात आम्ही फोरममध्ये पब्लिश करतो. तीच शंका इतर विद्यार्थ्यांचीही असू शकते. त्यामुळे या व्हिडिओचा इतर विद्यार्थ्यांनाही उपयोग होतो. एखाद्या विद्यार्थ्याला त्या शंकेचे उत्तर येत असेल तर तो ते उत्तर फोरममध्ये पोस्ट करू शकतो. म्हणजे जणू तुम्ही एकमेकांच्या सानिध्यात असल्यासारखेच असते. इथे सारे स्वातंत्र्य आणि शिकण्याचे बंधनही असते. जबाबदारीची जाणीव असते. तुम्ही रोज नियमित किती अभ्यास करता यावर आमचे लक्ष असते. तुमच्या प्रॅक्टिकल कामाचे नियमित मोजमाप असते. प्रॅक्टिकल कामात तुम्ही कुठे चुकलात तर त्याचे वैयक्तिक मार्गदर्शन असते. परीक्षेपुरता अभ्यास आणि नोकरीसाठी शिक्षण ही  प्रचलित कालबाह्य थेअरीबाज शिक्षण पद्धती आम्ही मानत नाही. म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून एका परिपूर्ण ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी प्रयत्नशील होतो. ही ऑनलाईन शिक्षण पद्धती कोणत्याही प्रचलित शिक्षण पद्धतीपेक्षा नक्कीच सरस  आहे. 

Step 13. Lesson 03 मधील तीन टॉपिक्स पूर्ण केल्यावर Lesson 03 पेजवरील MARK COMPLETE बटनवर क्लिक करा. 

स्टेप 14 : Exam page ओपन होईल. Exam देण्यापूर्वी आणखी अभ्यास / उजळणी करून तुम्ही नंतर परीक्षा देऊ शकता. Exam सुरु करण्यासाठी Start Exam बटनवर क्लिक करा.

स्टेप 15 : Exam सुरु  होईल. वेळ अर्धा तास असतो. 

स्टेप 16 : सर्व प्रश्नांची उत्तरे  दिल्यानंतर Exam Summary बटनवर  क्लिक करा.

स्टेप 17 : Exam Summary पेज ओपन होईल. तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याची खात्री करा आणि Finish Exam बटनवर क्लिक करा.

स्टेप 18 : हा Exam चा Result. तुमची किती उत्तरे बरोबर आहेत ते समजेल.

स्टेप 19 : आता PRINT YOUR CERTIFICATE वर क्लिक करा आणि सर्टिफिकेट डाउनलोड करा.

स्टेप 20 : शेवटी Result पेजवरील  Click Here to Continue बटनवर क्लिक करा. आणि तुमच्या कोर्स पेजवर या. तुम्ही कोर्स पूर्ण केला आहे. त्याचे सर्टिफिकेट इथूनही डाऊनलोड करू  शकता.  Welcome मेनूवर जा आणि My Courses वर  क्लिक करा.

स्टेप 21 : My Courses page वर सुरु असलेल्या तसेच पूर्ण केलेल्या कोर्सची संपूर्ण माहिती असते.

चित्रकला, फोटोग्राफी, जाहिरात कला, प्रिंटिंग, पब्लिकेशन, पॅकेजिंग किंवा वेब डिझाईनची आवड असणाऱ्यांना ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करण्यासाठी, घरात बसून मराठीतून शिकविणारा हा एकमेव साधा, सोपा आणि परिपूर्ण ऑनलाईन कोर्स आहे. 

सारांश: लॉक डाऊन कधी संपणार? कॉलेज कधी सुरु होणार? प्रवेश कुठे घ्यायचा ? सारी धावाधाव… सोशल डिस्टन्स… करिअर कसे होणार? नोकरी मिळणार का?  नोकरी असेल तर टिकणार का? हे सारे प्रश्न गुंडाळून ठेवा. घरातच एक मस्त ऑनलाईन क्लासरूम सेट करा. हा फ्री डेमो कोर्स करा. आणि आमचे स्टेप बाय स्टेप सुरु होणारे 100 टक्के प्रॅक्टिकल ग्राफिक डिझाईन स्किल्स कोर्सेस शिकायला तयार राहा. 

आता तुम्ही आमच्याकडे नाही, आम्ही तुमच्या घरी येऊन शिकविणार. ऑनलाईन. 

आणि हो, ह्या ऑनलाईन शिकण्याच्या पद्धतीबद्दल आपले मत, आपला अभिप्राय, आपल्या शंका किंवा सूचना जरूर कमेंट करा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.