ग्राफिक डिझाईनची सुरुवातच ड्रॉईंगपासून होते. कर्व ऑब्जेक्ट हा कोरल ड्रॉमधील पहिला मूळ आकार आहे. त्यानंतर त्रिकोण, चौकोन, वर्तुळ आदी भौमितिक आकार येतात. आणि या बेसिक शेप्स पासूनच पुढे सुंदर कलाकृती बनते. म्हणून हे बेसिक शेप्स ड्रॉ करता येणे महत्वाचे आहे. ड्रॉ केलेला शेप नंतर एडिट करावा लागतो. तेंव्हा कोरल ड्रॉमधील बेसिक ड्रॉईंग आणि एडिटिंग शिकविणारा हा सहावा व्हिडीओ लेसन पाहा. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.