ग्राफिक डिझाईनसाठी कोणतेही सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात करण्यापुर्वी, त्या सॉफ्टवेअरचा इंटरफेस समजून घेणे खूप महत्वाचे असते. या ब्लॉगमधील चौथ्या लेसनमध्ये मी विस्ताराने कोरल ड्रॉचा इंटरफेस याविषयी लिहिले आहे. पण तरीही कोरल ड्रॉचा इंटरफेस अधिक चांगल्या पध्दतीने समजण्यासाठी मी हा व्हिडीओ बनवलाय. तो पाहा आणि आपला अभिप्राय जरुर पाठवा. आपण ब्लॉगचे सबस्क्रायबर आहातच. तसेच या नवीन सुरु केलेल्या माझ्या शैक्षणिक युट्युब चॅनलसाठीही SUBSCRIBE करा. म्हणजे नवीन व्हिडीओबद्दल ब्लॉग लिहिण्याआधीच तो व्हिडीओ पब्लिश केल्या केल्या लगेच, तुम्हाला त्या व्हिडीओचे नोटिफिकेशन मिळेल.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.