
‘ग्राफिक डिझाईन’मधील ऑब्जेक्ट्सची मांडणी हा सौदर्यदृष्टीचा विचार करता अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण ग्राफिक डिझाईन पाहणाऱ्याला चांगलं दिसावं हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. कमर्शिअल आर्टमध्ये आर्टिस्टला नेहमी दुसऱ्याच्या दृष्टीनेच पाहावे लागते. ग्राफिक डिझाईनमध्ये विविध ऑब्जेक्ट्सची मांडणी करताना बॅलन्स साधला पाहिजे असे आर्टस्कूलमध्ये आम्हाला शिकवले होते. पण त्यावेळी बॅलन्स म्हणजे नेमके काय असते ते समजलेच नव्हते. […]