ग्राफिक डिझाईनमधील करिअर : शंका निरसन परिसंवाद

वर्षात कमवायला शिकविणाऱ्या ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्सची नवीन मराठी बॅच, नवीन मराठी वर्षात नवीन जागेत सुरु.

नमस्कार, मी भागवत पवार,

आर्टेक डिजिटलच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मी ग्राफिक डिझाईन शिकवतोय. त्यामध्ये सुरुवातीला ऍडव्हर्टायझिंग, प्रिंटिंग, प्रिंट पब्लिकेशन आणि  प्रिंट पॅकेजिंगसाठी ग्राफिक डिझाईन्स कशी बनतात याचा प्रॅक्टिकल अभ्यास आहे. त्यानंतर वेब डिझाईन तसेच ऑनलाईन मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी ग्राफिक डिझाईन्स कशी बनतात याचा प्रॅक्टिकल अभ्यास आहे. प्रिंट आणि वेब मीडियाबरोबरच फेसबुक, युट्युबसारख्या सोशल मिडीयांसाठी प्रमोशनल ग्राफिक डिझाईन्स आणि व्हिडीओज कसे बनतात याचाही अभ्यास आहे. फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंगमध्येसुद्धा ग्राफिक डिझाईन हाच  पाया असल्याने या दोन विषयांचाही स्वतंत्र अभ्यासक्रम आहे.

ग्राफिक डिझाईन ही एक कला आहे आणि याची व्यावसायिक व्याप्ती अमर्याद आहे. कलेच्या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ग्राफिक डिझाईनमधील करिअरसारखे दुसरे करिअर नाही. तेंव्हा कलेची आवड असणाऱ्यांसाठी ‘ग्राफिक डिझाईनमधील करियर’ काय असतं हे मी अगोदर थोडक्यात सांगतो आणि नंतर स्टेप बाय स्टेप ग्राफिक डिझाईन आपल्याला शिकायचं आहे.

ग्राफिक डिझाईन म्हणजे नेमकं असतं तरी काय?

तुमचा विश्वास बसणार नाही, पण मित्रानो खरं सांगू का? ग्राफिक डिझाईन शिकायला खूप साधं आणि सोपं आहे. तुम्ही सुद्धा ग्राफिक डिझाईन शिकून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही फक्त निश्चय करा. तुम्हाला प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर बनवण्याचे काम माझे. मी सांगतो तसे तंतोतंत शिका, समजून घ्या, प्रॅक्टिकल अभ्यास करा… बस्स.

साध्या, सोप्या भाषेत आणि एका वाक्यात ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते सांगायचे झाल्यास मी असं सांगेन… ‘विशिष्ट हेतू ठेवून निर्माण केलेली कोणतीही कलाकृती म्हणजे ग्राफिक डिझाईन’. मग ते साधे व्हिजिटिंग कार्ड असुदे, एखादे पोस्टर असुदे, एखादी जाहिरात असुदे, फोटो अल्बम, ऍनिमेशन व्हिडीओ  किंवा एखादा चित्रपट असुदे. हे सारं ग्राफिक डिझाईनमध्येच येतं. ग्राफिक डिझाईनमध्ये आणखी काय काय येतं तुम्हाला पाहिजे असेल तर थोडक्यात ही लिस्ट पहा.

 • लोगो / सिम्बॉल डिझाईन,
 • कार्पोरेट आयडेंटिटी डिझाईन,
 • लीफलेट / फ्लायर / हॅण्डबील डिझाईन,
 • फोल्डर / बुकलेट / कॅटलॉग डिझाईन,
 • स्टिकर डिझाईन,
 • बुक कव्हर डिझाईन,
 • वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक डिझाईन,
 • जाहिरात डिझाईन,
 • पोस्टर / बॅनर / होर्डिंग डिझाईन,
 • बॉक्स प्रिंट पॅकेजिंग,
 • पाऊच प्रिंट पॅकेजिंग,
 • लेबल प्रिंट डिझाईन,
 • साईन बोर्ड डिझाईन,
 • आय कार्ड डिझाईन,
 • कॅलेंडर डिझाईन.
 • वेब डिझाईन,
 • ब्लॉग डिझाईन,
 • ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग
 • ऑनलाईन मार्केटिंग,
 • सोशल नेटवर्क
  • फेसबुक पेज डिझाईन,
  • युट्युब चॅनल डिझाईन,
 • फोटोग्राफी
 • फोटो एडिटिंग / मिक्सिंग,
 • लग्नाचे फोटो अल्बम,
 • व्हिडीओग्राफी,
 • व्हिडीओ एडिटिंग / मिक्सिंग,
 • फिल्म मेकिंग / टीव्ही ऍड,

इ. इ. इ. अनेक प्रकारची डिझाईन्स ग्राफिक  डिझाईनरला बनवायची असतात. यापैकी एखादा डिझाईन प्रकारही स्वतंत्र करिअरसाठी पुरेसा आहे. ग्राफिक डिझाईन हे सर्वव्यापी करिअर क्षेत्र आहे. त्यामुळे ग्राफिक डिझाईनरला नोकरीसाठी भटकत बसण्याची गरज नाही. अगदी कमी भांडवलात तो स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो. आणि नोकरीच करायची असेल तर तुम्हाला बोलावून घेतले पाहिजे या मताचा मी आहे. हे सारं शक्य आहे. पण आधी तुमचा निश्चय पक्का झाला पाहिजे कि, मला ग्राफिक डिझाईनरच बनायचं आहे. स्टेप बाय स्टेप ग्राफिक डिझाईन स्किल्स शिका आणि एक प्रोफेशनल ग्राफिक डिझाईनर व्हा.

हा कोर्स तुम्ही आर्टेक डिजिटलच्या पुण्यातील मुख्य शाखेत प्रत्यक्ष येऊन शिका,  घरी बसून किंवा तुमच्या नजीकच्या ग्राफिक आर्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईनही शिकू शकता. ग्राफिक डिझाईनच्या या ऑनलाईन / ऑफलाईन कोर्सचे स्वरूप, व्याप्ती, करिअर संधी आणि काही निवडक ट्युटोरिअल्स मी  दर आठवड्याला पब्लिश करणार आहे. कि ज्यामुळे ग्राफिक डिझाईनर बनण्याचा तुमचा निश्चय पक्का होईल. ग्राफिक डिझाईनमधील करिअर विषयी काही शंका असल्यास प्रत्यक्ष इन्स्टिट्यूटमध्ये येऊन भेटा आणि शंका दूर करा. किंवा ग्राफिक डिझाईनमधील करिअर – शंका निरसन परिसंवादात सहभागी व्हा. त्यासाठी खालील फॉर्म भरून नोंदणी करा.

[ninja_forms id=13]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.