‘ग्राफिक डिझाईन’मधील ऑब्जेक्ट्सची मांडणी हा सौदर्यदृष्टीचा विचार करता अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण ग्राफिक डिझाईन पाहणाऱ्याला चांगलं दिसावं हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. कमर्शिअल आर्टमध्ये आर्टिस्टला नेहमी दुसऱ्याच्या दृष्टीनेच पाहावे लागते. ग्राफिक डिझाईनमध्ये विविध ऑब्जेक्ट्सची मांडणी करताना बॅलन्स साधला पाहिजे असे आर्टस्कूलमध्ये आम्हाला शिकवले होते. पण त्यावेळी बॅलन्स म्हणजे नेमके काय असते ते समजलेच नव्हते. पुढे काही वर्षांनी जसजसे काम करीत गेलो तसतसे ते हळू हळू समजत गेले. ऑब्जेक्ट्सची नियमित किंवा अनियमित मांडणी करताना बॅलन्स कसा साधायचा ते आपण नंतर सविस्तर शिकूच. पण त्याआधी ऑब्जेक्ट्सच्या मांडणीचे प्राथमिक प्रकार कोणते ते पाहू.
1. ऑब्जेक्ट्सची उभी मांडणी (Vertical Alignment) :
दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्स एकाखाली एक उभ्या सरळ रेषेत ठेवायचे म्हणजे ऑब्जेक्ट्सची उभी मांडणी. वेगवेगळ्या साईजचे हे ऑब्जेक्ट्स पिक टूलने उचलून आपण अंदाजे एकाखाली एक ठेऊ शकतो, पण ते परफेक्ट उभ्या सरळ रेषेत असतीलच असे नाही. म्हणून इथे कमांड देऊन ते ऑब्जेक्ट्स आपल्याला उभ्या सरळ रेषेत ठेवायचे आहेत.
2. ऑब्जेक्ट्सची आडवी मांडणी (Horizontal Alignment) :
दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट्स एकासमोर एक आडव्या सरळ रेषेत ठेवायचे म्हणजे ऑब्जेक्ट्सची आडवी मांडणी. इथेही वेगवेगळ्या साईजचे हे ऑब्जेक्ट्स पिक टूलने उचलून आपण अंदाजे एकासमोर एक ठेऊ शकतो, पण ते परफेक्ट आडव्या सरळ रेषेत असतीलच असे नाही. म्हणून कमांड देऊन ते ऑब्जेक्ट्स आपल्याला आडव्या सरळ रेषेत ठेवायचे आहेत.
ऑब्जेक्ट्स उभ्या सरळ रेषेत किंवा आडव्या सरळ रेषेत ठेवणे म्हणजेच ही मांडणी / अलाईनमेंट संकल्पना नेमकी काय आहे ते समजून घेऊ आणि कमांड देऊन ते ऑब्जेक्ट्स उभ्या किंवा आडव्या सरळ रेषेत ठेऊ. ग्राफिक डिझाईन मध्ये अलाईनमेंट हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. अलाईनमेंट ही कमांड ऑब्जेक्ट्सच्या डिफॉल्ट नऊ पोझिशन्सशी संबंधित आहे. डिफॉल्ट नऊ पोझिशन्सचा अभ्यास आपण मागे केलाच आहे. तो अभ्यास जर तुम्ही समजून घेऊन व्यवस्थित केला असेल तर ही अलाईनमेंट संकल्पना तुम्हाला लगेच समजेल. समजायला तशी ही संकल्पना एकदम सोपी आहे. पण प्रॅक्टिकल करताना थोडा गोंधळ होऊ शकतो. म्हणून निट समजून घ्या. त्यासाठी आपण वेगवेगळ्या साईजचे तीन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स घेऊ. (चित्र 20.01).
हे तीन ऑब्जेक्ट्स उभ्या किंवा आडव्या सरळ रेषेत नाहीत हे नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल. उभ्या आणि आडव्या मांडणीचे प्रत्येकी तीन उपप्रकार पडतात.
उभ्या मांडणीच्या तीन प्रकारांमध्ये –
1.1. व्हर्टिकल लेफ्ट अलाईनमेंट (Vertical Left Alignment) :
एकाखाली एक ठेवलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टची डावी बाजू उभ्या सरळ रेषेत असणे म्हणजे ‘व्हर्टिकल लेफ्ट अलाईनमेंट’. A, B आणि C ऑब्जेक्ट्स एकाखाली एक ठेवले असतील आणि प्रत्येक ऑब्जेक्टची डावी बाजू उभ्या सरळ रेषेत असेल तर ती मांडणी म्हणजे ‘व्हर्टिकल लेफ्ट अलाईनमेंट’. (चित्र 20.02).
लक्षात घ्या कि, कोणत्याही ऑब्जेक्टच्या डाव्या बाजूकडील डिफॉल्ट तीन पोझिशन्सच्या (टॉप-लेफ्ट, लेफ्ट-सेंटर आणि बॉटम-लेफ्ट) X आणि Y पोझिशनपैकी X पोझिशन व्हॅल्यू सारखीच असते. लेफ्ट अलाईनमेंट कमांड दिल्यानंतर सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट्स डाव्या बाजूला अलाईन होतात. याचाच अर्थ सिलेक्ट केलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टची X पोझिशन एकच होते. करूनच पहा.
चित्र 20.01 प्रमाणे A, B आणि C ऑब्जेक्ट्स ड्रॉ करा. सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट्स शेवटी सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टला अलाईन होतात. आपल्याला B आणि C ऑब्जेक्ट्स A ऑब्जेक्टला अलाईन करायचे आहेत. म्हणून पिक टूलने प्रथम ऑब्जेक्ट B सिलेक्ट करा. Shift बटन दाबून धरून ऑब्जेक्ट C सिलेक्ट करा आणि शेवटी Shift बटन तसेच दाबून धरून ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. काम करताना नेहमी स्टेटस बारकडे लक्ष ठेवा. म्हणजे जे करतो आहे ते ठीक आहे याची खात्री होईल. स्टेटस बारमध्ये 3 Objects Selected on Layer 1 असे दिसेल. मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Align and Distribute मधील Align Left वर क्लिक करा. B आणि C ऑब्जेक्ट A ऑब्जेक्टच्या डाव्या बाजूला अलाईन होतील (चित्र-20.02). याचा अर्थ असा कि आता A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सची लेफ्ट X पोझिशन एकच होते.
1.2. व्हर्टिकल सेंटर अलाईनमेंट (Vertical Center Alignment) :
एकाखाली एक ठेवलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टचा सेंटर उभ्या सरळ रेषेत असणे म्हणजे ‘व्हर्टिकल सेंटर अलाईनमेंट’. A, B आणि C ऑब्जेक्ट्स एकाखाली एक असतील आणि प्रत्येक ऑब्जेक्टचा सेंटर उभ्या सरळ रेषेत असेल तर ती मांडणी म्हणजे ‘व्हर्टिकल सेंटर अलाईनमेंट’. करून पहा.
चित्र 20.01 मधील ऑब्जेक्ट B, ऑब्जेक्ट C आणि शेवटी ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Align and Distribute मधील Align Centers Vertically वर क्लिक करा. B आणि C ऑब्जेक्ट A ऑब्जेक्टच्या सेंटरला अलाईन होतील (चित्र-20.03).
याचा अर्थ असा कि आता A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सची सेंटर X पोझिशन एकच होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सिलेक्ट केलेल्या A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सचे सेन्टर्स उभ्या सरळ रेषेत येतात.
1.3. व्हर्टिकल राईट अलाईनमेंट (Vertical Right Alignment) :
एकाखाली एक ठेवलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टची उजवी बाजू उभ्या सरळ रेषेत असणे म्हणजे ‘व्हर्टिकल राईट अलाईनमेंट’. A, B आणि C ऑब्जेक्ट्स एकाखाली एक ठेवले असतील आणि प्रत्येक ऑब्जेक्टची उजवी बाजू उभ्या सरळ रेषेत असेल तर ती मांडणी म्हणजे ‘व्हर्टिकल राईट अलाईनमेंट’. करून पहा.
चित्र 20.01 मधील ऑब्जेक्ट B, ऑब्जेक्ट C आणि शेवटी ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Align and Distribute मधील Align Right वर क्लिक करा. B आणि C ऑब्जेक्ट A ऑब्जेक्टच्या राईटला अलाईन होतील (चित्र-20.04).
याचा अर्थ असा कि आता A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सची राईट X पोझिशन एकच होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सिलेक्ट केलेल्या A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सच्या उजव्या बाजू उभ्या सरळ रेषेत येतात.
जसे उभ्या मांडणीचे तीन उपप्रकार पडतात तसेच आडव्या मांडणीचेही तीन प्रकार पडतात. ते असे –
2.1. हॉरिझाँटल टॉप अलाईनमेंट (Horizontal Top Alignment) :
एकासमोर एक ठेवलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टची वरची (Top) बाजू आडव्या सरळ रेषेत असणे म्हणजे ‘हॉरिझाँटल टॉप अलाईनमेंट’. A, B आणि C ऑब्जेक्ट्स एकासमोर एक ठेवले असतील आणि प्रत्येक ऑब्जेक्टची वरची बाजू आडव्या सरळ रेषेत असेल तर ती मांडणी म्हणजे ‘हॉरिझाँटल टॉप अलाईनमेंट’. करून पहा.
चित्र 20.01 मधील ऑब्जेक्ट B, ऑब्जेक्ट C आणि शेवटी ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Align and Distribute मधील Align Top वर क्लिक करा. B आणि C ऑब्जेक्ट A ऑब्जेक्टच्या टॉपला अलाईन होतील (चित्र-20.05).
याचा अर्थ असा कि आता A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सची टॉप Y पोझिशन एकच होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सिलेक्ट केलेल्या A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सचे टॉप्स आडव्या सरळ रेषेत येतात.
2.2. हॉरिझाँटल सेंटर अलाईनमेंट (Horizontal Center Alignment) :
एकासमोर एक ठेवलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टचा सेंटर (Center) आडव्या सरळ रेषेत असणे म्हणजे ‘हॉरिझाँटल सेंटर अलाईनमेंट’. म्हणजे A, B आणि C ऑब्जेक्ट्स एकासमोर एक ठेवले असतील आणि प्रत्येक ऑब्जेक्टचा सेंटर आडव्या सरळ रेषेत असेल तर ती मांडणी म्हणजे ‘हॉरिझाँटल सेंटर अलाईनमेंट’. करून पहा.
चित्र 20.01 मधील ऑब्जेक्ट B, ऑब्जेक्ट C आणि शेवटी ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Align and Distribute मधील Align Centers Horizontally सिलेक्ट करा. B आणि C ऑब्जेक्ट A ऑब्जेक्टच्या सेंटरला अलाईन होतील (चित्र-20.06).
याचा अर्थ असा कि आता A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सची हॉरिझाँटल सेंटर Y पोझिशन एकच होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सिलेक्ट केलेल्या A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सचे सेंटर्स आडव्या सरळ रेषेत येतात.
2.3. हॉरिझाँटल बॉटम अलाईनमेंट (Horizontal Bottom Alignment) :
एकासमोर एक ठेवलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टची खालची (Bottom) बाजू आडव्या सरळ रेषेत असणे म्हणजे ‘हॉरिझाँटल बॉटम अलाईनमेंट’. म्हणजेच A, B आणि C ऑब्जेक्ट्स एकासमोर एक ठेवले असतील आणि प्रत्येक ऑब्जेक्टची खालची (Bottom) बाजू आडव्या सरळ रेषेत असेल तर ती मांडणी म्हणजे ‘हॉरिझाँटल बॉटम अलाईनमेंट’. करून पहा.
चित्र 20.01 मधील ऑब्जेक्ट B, ऑब्जेक्ट C आणि शेवटी ऑब्जेक्ट A सिलेक्ट करा. मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Align and Distribute मधील Align Bottom सिलेक्ट करा. B आणि C ऑब्जेक्ट A ऑब्जेक्टच्या बॉटमला अलाईन होतील (चित्र-20.07).
याचा अर्थ असा कि आता A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सची बॉटम Y पोझिशन एकच होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास सिलेक्ट केलेल्या A, B आणि C या तीनही ऑब्जेक्ट्सचे बॉटम्स आडव्या सरळ रेषेत येतात.
3. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट पेजच्या सेंटरला ठेवणे :
सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट्स शेवटी सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टला अलाईन होतात. हे आपण पाहिले. पण कधी कधी सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट पेजच्या मधोमध सेंटरला ठेवायचा असतो. अशा वेळी जो ऑब्जेक्ट पेजच्या बरोबर सेंटरला ठेवायचा आहे, तो सिलेक्ट करा. मेनू बारमधील Arrange मेनूवर क्लिक करून Align and Distribute मधील Center to Page वर सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट पेजच्या सेंटरला येईल.
4. अलाईनमेंट ‘शॉर्ट की’ज :
सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्ट्सची व्हर्टिकल आणि हॉरिझाँटल अलाईनमेंट करताना आपण मेनूबार मधील Arrange वर क्लिक करून अलाईनमेंटची आपणास हवी असलेली कमांड दिली. पण ग्राफिक डिझाईनमध्ये ही कमांड वापरताना प्रत्येक वेळी मेनू बारमध्ये जाण्याची गरज नाही. कमांड्ससाठी असलेल्या शॉर्ट की वापरून या कमांड देणे सोपे होते. या शॉर्ट की कोणत्या आणि त्याचा वापर कसा होतो, हे आपण एक छोटेसे प्रॅक्टिकल करून बघू. करून पहा.
वरील चित्र 20.08 प्रमाणे प्रथम एक रॅक्टँगल ड्रॉ करून त्यामध्ये येलो कलर भरा आणि नंतर बाजूला छोटी छोटी नऊ रेड इलीप्स ड्रॉ करा. त्या इलिप्सना 1 ते 9 नंबर्स द्या. आता ही नऊ इलिप्स रॅक्टँगलच्या डिफॉल्ट नऊ पोझिशन्सला आपण अलाईन करून पाहू. मात्र व्हर्टिकल आणि हॉरिझाँटल अलाईनमेंटच्या वरील 6 कमांड कमांड्स वापरताना आपण शॉर्ट किंचा वापर करू.
प्रथम पहिले रेड इलिप्स-1 सिलेक्ट करा. शिफ्ट बटन दाबून धरून येलो रॅक्टँगल सिलेक्ट करा. आणि कीबोर्ड वरील T की (बटन) दाबा. इलिप्स-1 रॅक्टँगलच्या हॉरिझाँटल टॉप पोझिशनला अलाईन होईल. (चित्र-20.09).
नंतर लगेच कीबोर्ड वरील L की (बटन) दाबा. पुन्हा तेच इलिप्स-1 रॅक्टँगलच्या व्हर्टिकल लेफ्ट पोझिशनला अलाईन होईल. (चित्र-20.10).
म्हणजे लक्षात येते का पहा कि मूळ ठिकाणचे इलिप्स-1 रॅक्टँगलच्या टॉप-लेफ्ट पोझिशनला नेऊन ठेवायचे असेल किंवा अलाईन करायचे असेल तर इलिप्स-1 आणि नंतर रॅक्टँगल सिलेक्ट करून प्रथम अलाईन टॉप (शॉर्ट की T) आणि नंतर लगेच अलाईन लेफ्ट (शॉर्ट की L) अशा सलग दोन कमांड्स आपण दिल्या. दोन ऑब्जेक्ट्स सिलेक्ट केल्यावर तुम्ही प्रथम L (अलाईन-लेफ्ट) आणि नंतर T (अलाईन-टॉप) अशा क्रमानेही कमांड देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही उर्वरित आठ इलिप्स रॅक्टँगलच्या बाकीच्या आठ पोझिशन्सना नेऊन ठेवा. (चित्र-20.11)
हे करताना अलाईनमेंटच्या खालील शॉर्ट कीचा वापर करा.
1 | व्हर्टिकल लेफ्ट अलाईनमेंट (Vertical Left Alignment) | L |
2 | व्हर्टिकल सेंटर अलाईनमेंट (Vertical Center Alignment) | C |
3 | व्हर्टिकल राईट अलाईनमेंट (Vertical Right Alignment) | R |
4 | हॉरिझाँटल टॉप अलाईनमेंट (Horizontal Top Alignment) | T |
5 | हॉरिझाँटल सेंटर अलाईनमेंट (Horizontal Center Alignment) | E |
6 | हॉरिझाँटल बॉटम अलाईनमेंट (Horizontal Bottom Alignment) | B |
7 | ऑब्जेक्ट पेजच्या सेंटरला ठेवणे (Center to Page) | P |
वरील 7 कमांड्स तुम्ही Align and Distribute हा डायलॉग बॉक्स ओपन करूनही देऊ शकता. करून पाहा.
मेनू बारमधील Arrange मेनूमधील Align and Distribute वर क्लिक करून ड्रॉप डाऊन मेनूमधील पुन्हा Align and Distribute वर क्लिक करा. Align and Distribute डायलॉग बॉक्स ओपन होईल. (चित्र-20.12)
चित्र 20.12 मधीलच प्रथम पहिले रेड इलिप्स-1 सिलेक्ट करा. शिफ्ट बटन दाबून धरून येलो रॅक्टँगल सिलेक्ट करा. ओपन केलेल्या Align and Distribute डायलॉग बॉक्समधील Align Left आणि नंतर आणि Align Top या दोन्ही कमांड बटन्सवर क्लिक करा. छोटे इलिप्स रॅक्टँगलच्या Top-Left पोझिशनला अलाईन होईल. (चित्र-20.13)
म्हणजेच समजते का पाहा, दोन ऑब्जेक्ट सिलेक्ट करून एका वेळी आपण दोन कमांड्स दिल्या. याच पद्धतीने तुम्ही उर्वरित आठ इलिप्स खालील चित्र-20.14 प्रमाणे रॅक्टँगलच्या बाकीच्या आठ पोझिशन्सना नेऊन ठेवा.
4. होम वर्क :
समजा एखाद्या डिझाईनमध्ये हीच छोटी छोटी नऊ इलिप्स रॅक्टँगलच्या कडेपासून बाहेर (Edge वर) चित्र-20.15 मध्ये दाखविल्याप्रमाणे कमांड्स देऊन ठेवायची असतील तर कशी ठेवाल?
आज आणि आजपर्यंत शिकलेल्या कोणत्याही कमांड्स वापरून तुम्ही अशी मांडणी करण्याचा प्रयत्न करा. थोडे बारकाईने पाहा, इलिप्स 1, 3, 7 आणि 9 यांची कडा (Edge) रॅक्टँगलच्या कॉर्नर पोझिशनवर आहे. आत्तापर्यंतचे सर्व लेसन्स तुम्ही लक्षपूर्वक शिकला असाल तर तुम्ही हे नक्की कराल. नाही जमले तर अगोदरचे लेसन्स पुन्हा समजून घ्या आणि पुन्हा करण्याचा प्रयत्न करा. मात्र हे तुम्हालाच करायचे आहे.
पुढच्या लेसनमध्ये आपण अलाईनमधील डिस्ट्रिब्युट हा टॉपिक पाहू.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला परफेक्ट ग्राफिक डिझाईनर बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.
पुन्हा भेटू पुढच्या लेसनच्या वेळी पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत सराव करीत रहा.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.
Very nice guide sir
Thank you, Vishal