असे म्हणतात कि, ‘असावे जातीचे..’. एकाच अवघड विषयाचे दोन शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवितात. एका शिक्षकाने शिकविलेले विद्यार्थ्यांना समजते आणि दुसऱ्या शिक्षकाने शिकविलेले समजत नाही. याचा अनुभव सर्वांना आलाच असेल. अशा वेळी प्रश्न पडतो कि, विषय अवघड कि शिक्षक? मुळात अवघड विषय आणि सोपा विषय असे काही नसतेच. नाही समजले तर सोपा विषयसुद्धा अवघड वाटतो. आणि समजले तर अवघड असणारा विषयही सोपा वाटतो. विषयाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या शिक्षकाने शिकविलेले समजते. पण मात्र जेंव्हा शिक्षकाने सांगितलेले विद्यार्थ्याला समजत नाही तेंव्हा विद्यार्थी ‘ढ’ असतो, असे मुळीच नसते. ‘ढ’ आणि ‘हुशार’ ह्या सापेक्ष कल्पना आहेत. विद्यार्थी कसाही असुदे. शिकविण्यासाठी शिक्षकाने जातीचे असायला हवे. ग्राफिक डिझाईनच्या बाबतीत तर ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल’ असे असते. म्हणजे समजा तुम्ही नोकरीच करायची ठरविले असेल तर मुलाखतीच्या वेळीसुद्धा ‘करून दाखव, नाहीतर घरला जा.’ असे आव्हान असते. तेंव्हा जातीचे ग्राफिक डिझाईनर व्हा म्हणजे कसली अडचण येणार नाही. त्यासाठी प्रत्येक लेसन काळजीपूर्वक वाचा आणि मुख्य म्हणजे त्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रॅक्टिकल करा.
फील आणि आऊटलाईन जरी साधा टॉपिक असला तरी त्याचा आजचा तिसरा भाग आहे. महत्वाचा आहे म्हणून गांभीर्याने समजून घेतला पाहिजे. गेल्या भागात शेवटी आपण आऊटलाईन शिकत होतो. ऑब्जेक्टच्या आऊटलाईनचा कलर, आऊटलाईनची जाडी, निब शेप, कॉर्नर्स आणि लाईन कॅप्स आदी अभ्यास आपण केला. आता पुढे.
२. अॅरो आणि स्टाईल :
लाईन ड्रॉ केल्यानंतर त्या लाईनच्या पहिल्या आणि शेवटच्या टोकांना जर अॅरो हवा असेल तर Outline Pen डायलॉग बॉक्समधील Arrows च्या खालील दोन ड्रॉप-डाऊन बॉक्समधून हवा असलेला पहिला आणि दुसरा अॅरो निवडून OK करा (चित्र:15.01-A). लाईनच्या एकाच टोकाला अॅरो पाहिजे असेल तर एकाच बॉक्समधील अॅरो सिलेक्ट करा आणि OK करा. एखाद्या शैक्षणिक प्रोजेक्ट ड्रॉईंगची माहिती किंवा एखाद्या मेकॅनिकल ऑब्जेक्टमधील स्पेअर-पार्टसची नावे दर्शविण्यासाठी या अॅरोंचा उपयोग करतात. शिवाय गरज असेल तिथे कुठेही डिझाईन मध्ये तुम्ही अॅरो वापरू शकता. पण जातीचा आर्टिस्ट हे रेडिमेड अॅरो वापरत नाही. तो अॅरो तयार करून वापरतो. का ते नंतर तुम्हालाही न सांगता समजेल. तातडीने करायच्या डिझाईन्समध्ये हे रेडिमेड अॅरो वापरायला काहीच हरकत नाही.
लाईन ड्रॉ केल्यानंतर त्या लाईनची स्टाईल बदलण्यासाठी Outline Pen डायलॉग बॉक्समधील Style खालील ड्रॉप-डाऊन बॉक्सवर क्लिक करा आणि योग्य ती स्टाईल निवडून OK करा (चित्र:15.01-B). अॅरो आणि स्टाईलमधील इतर ऑप्शन्स पाहण्याची आत्ता गरज नाही.
3. बिहाईंड फील (Behind fill) :
Outline Pen ची बिहाईंड फील ही एक महत्वाची कमांड आहे. आपण पाहिले कि ऑब्जेक्टची आऊटलाईन ही त्या ऑब्जेक्टच्या कडेपासून आत आणि बाहेर निम्मी निम्मी असते. समजा ऑब्जेक्टची आऊटलाईन 10 mm असेल तर ती त्या ऑब्जेक्टच्या कडेपासून 5 mm आत आणि 5 mm बाहेर असते. (चित्र:15.02-A). पण डिझाईन करताना आऊटलाईनच्या जाडीमुळे मूळ शेप दिसण्यास बाधा येते. अक्षरे किंवा कोणत्याही ऑब्जेक्टच्या कडेपासून आत आलेली आऊटलाईन मूळ शेपच्या मागे जाण्यासाठी Behind fill ही कमांड आहे. करून पाहा.
कोणतेही एक अक्षर किंवा शब्द टाइप करून त्याला Outline Pen मध्ये जाऊन जाड आऊटलाईन द्या. त्याचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट करा. डुप्लिकेट केलेला ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. Outline Pen डायलॉग बॉक्समधील Behind fill समोरील चेक बॉक्सवर क्लिक करा, आणि OK करा (चित्र:15.02-B). दोन शब्दांमधील फरक तुमच्या लक्षात येईल. पहिल्या PUNE शब्दामध्ये अक्षरांच्या आऊटलाईनची जाडी अक्षराच्या कडेपासून आतमध्ये आल्यामुळे येलो कलरमध्ये दिसणारा शेप काहीसा विचित्र दिसतो. पण Behind fill कमांड दिलेला दुसरा PUNE शब्द परफेक्ट दिसतो. अशा गोष्टी डिझाईन करताना योग्य वेळी तुम्हाला आठवून वापरता आल्या पाहिजेत.
4. स्केल वुईथ ऑब्जेक्ट (Scale with object) :
एकदा ड्रॉईंग केलेला ऑब्जेक्ट डिझाईन करताना पुन्हा लहान किंवा मोठा करावा लागतो. ऑब्जेक्ट लहान किंवा मोठा करताना त्या ऑब्जेक्टच्या आउटलाईनची जाडी बदलत नाही. ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टला दिलेली जाडी ती त्या ऑब्जेक्टच्या साईजचा विचार करता त्यावेळी ठीक वाटते. पण तो ऑब्जेक्ट लहान किंवा मोठा केल्यानंतर आउटलाईनची जाडी न बदलल्यामुळे तो ऑब्जेक्ट प्रमाणात लहान मोठा झालेला दिसत नाही. त्या ऑब्जेक्टचे मूळ रूपच बदलते. खरे तर ऑब्जेक्ट प्रमाणात लहान किंवा मोठा केल्यानंतर त्या ऑब्जेक्टची जाडीही त्या प्रमाणात लहान किंवा मोठी झाली पाहिजे तरच मूळ ऑब्जेक्ट प्रमाणात लहान मोठा झालेला दिसेल. म्हणूनच मी म्हणत असतो कि मास्टर ड्रॉइंगमध्ये आऊटलाईन नकोच पाहिजे. पण जरी तुम्ही डिझाईनमध्ये एखाद्या ऑब्जेक्टला आऊटलाईन वापरली असेल तर तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि Outline Pen डायलॉग बॉक्समध्ये जावून Scale with object समोरील चेक बॉक्सवर क्लिक करा. क्लिक केल्या केल्या लगेच ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला फरक दिसणार नाही. पण तो ऑब्जेक्ट लहान किंवा मोठा केल्यावर त्याच्या आऊटलाईनची जाडी प्रमाणात लहान किंवा मोठी होताना तुम्हाला दिसेल.
चित्र 15.3 मधील A आणि B या दोन्ही ऑब्जेक्टच्या आऊटलाईन्स एकाच जाडीच्या आहेत. पैकी फक्त B ऑब्जेक्टला Scale with object कमांड दिली आहे. पण दोन्ही ऑब्जेक्ट लहान आणि मोठे केल्यावर A ऑब्जेक्टची जाडी आहे तेवढीच राहिल्यामुळे लहान आणि मोठा A ऑब्जेक्ट दिसायला प्रमाणात वाटत नाही. मात्र उलट B ऑब्जेक्ट लहान आणि मोठा केल्यावर त्या प्रमाणात त्याच्या आउटलाईनची जाडी बदलल्यामुळे तो लहान किंवा मोठा असला तरी योग्य प्रमाणात दिसतो.
लोगो / सिम्बॉल किंवा एखादे महत्वाचे ग्राफिक डिझाईन फायनल होते तेंव्हा साहजिकच गरजेनुसार ते डिझाईन आहे तसे प्रमाणात लहान किंवा आहे तसे प्रमाणात मोठे करावे लागते. त्यावेळी त्या डिझाईनमधील प्रत्येक ऑब्जेक्ट प्रमाणातच लहान मोठा होणे गरजेचे असते. चुकून डिझाईनमध्ये अशा जाड आउटलाईन असलेल्या ऑब्जेक्टला Scale with object कमांड न देता राहिली असेल तर तर मात्र घोटाळा होऊ शकतो. मुळात अशा महत्वाच्या डिझाइन्समध्ये आऊटलाईन वापरूच नका, आणि जर वापरलीच तर त्या जाड आउटलाईन असलेल्या ऑब्जेक्टला Scale with object कमांड देऊन काळजी घ्या.
ग्राफिक डिझाईनमध्ये योग्य त्या ठिकाणी आऊटलाईन असेल तर डिझाईन आकर्षक बनते. हे खरे आहे. पण आऊटलाईन फक्त दिसायला पाहिजे. प्रत्यक्षात तिथे ती असायला पाहिजे असे नाही. ती आऊटलाईन म्हणजे तो पूर्ण शेप / ऑब्जेक्ट असायला हवा. म्हणजे पाहा, फ्री हँड टूलने आडवी रेषा ड्रॉ करून Outline Pen मधून ती जाड करण्यापेक्षा रॅक्टँगल ड्रॉ करून त्याची उंची कमी करून तो रॅक्टँगल आडव्या आऊटलाईनसारखा दिसणारा करा. म्हणजे प्रॉब्लेमच येणार नाही. आऊटलाईन आडवी / उभी किंवा तिरकी सरळ असेल तर ते शक्य आहे. पण जर आऊटलाईन विशिष्ठ जाडीची वेडीवाकडी असेल तर काय? तर एक महत्वाची कमांड वापरा.-
आऊटलाईनचे रुपांतर ऑब्जेक्टमध्ये करणे. (Convert Outline To Object) :
फ्री हँड टूलने एक वेडीवाकडी कशीही आऊटलाईन ड्रॉ करा. Outline Pen मध्ये जाऊन तीची Width वाढवा. स्टेटस बारमध्ये उजव्या बाजूला पाहा. Fill None (म्हणजे फुलीचे चित्र) आणि Outline ब्लॅक कलर व विशिष्ठ जाडी असलेली दिसेल. नंतर मेनू बारवरील Arrange मेनू मध्ये जाऊन Convert Outline To Object वर क्लिक करा. दिसण्यामध्ये काहीच फरक दिसणार नाही मात्र त्या आउटलाईनचे रुपांतर ऑब्जेक्टमध्ये झालेले असते. खात्री करण्यासाठी पुन्हा स्टेटस बारमध्ये उजव्या बाजूला पाहा. Fill ब्लॅक कलर आणि Outline None (म्हणजे फुलीचे चित्र) दिसेल. (चित्र 15.4).
Wireframe मोडमध्ये जाऊनही तुम्ही आऊटलाईनचा ऑब्जेक्ट बनला आहे ते पाहू शकता. म्हणजेच आता ती आऊटलाईन न राहता तो पूर्ण ऑब्जेक्ट बनला आहे. हा ऑब्जेक्ट प्रमाणात कितीही लहान किंवा मोठा केला तरी फरक पडणार नाही. आऊटलाईनला Outline Pen मध्ये जाऊन Scale with object कमांड देण्यापेक्षा Arrange मेनूमधील Convert Outline To Object कमांड दिलेली केंव्हाही चांगली. पण लगेच मनामध्ये प्रश्न उभा राहतो कि एकाच गोष्टीसाठी या दोन कमांड्स कशासाठी? यालाही कारण आहे. पण आपण ते पुढे डिझाईन शिकताना पाहू.
कोरल ड्रॉमध्ये डिझाईनसाठी जे जे असायला पाहिजे ते ते सारे आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिकल करून समजून घ्यायला हवे. फील आणि आऊटलाईनच्या या तीन लेसन्समधून डिझाईनसाठी आवश्यक अशा काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकलो. आजपर्यंत एकूण पंधरा लेसन्स झाले. पुन्हा एकदा या पंधरा लेसन्सची उजळणी करून सर्व काही समजले आहे याची खात्री करा. कारण पुढे शिकण्यासाठी या पंधरा लेसन्समधील एकही गोष्ट विसरता कामा नये. कारण असेही आहे कि पुढले लेसन्स या सुरुवातीच्या लेसन्सवर आधारित आहेत. पुढे डिझाईनमधील परफेक्शनच्या दृष्टीने शिकण्यासाठी या बेसिक पंधरा लेसन्सचा अभ्यास खूप महत्वाचा आहे.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला जातीचे ग्राफिक डिझाईनर बनायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.
(सूचना : हा ब्लॉग सुरु केल्यापासून हजारो वाचकांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल धन्यवाद. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स ‘ प्रत्यक्ष शिकण्याविषयी विचारणा केली आहे. पण सर्वच विद्यार्थ्याना मी प्रत्यक्ष शिकवू शकत नाही. तरीही फक्त 20 विद्यार्थ्यांची एक सायंकाळची बॅच लवकरच सुरु करणार आहे. अधिक माहिती Subscriber केलेल्या आणि प्रत्यक्ष शिकण्यास इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई-मेलने मी लवकरच पाठवून देईन.)
…

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.
क्या आप क्लासेज हिंदी या इंग्लिश में नही लेते? उन छात्रो के लिए जिन्हें मराठी नही आती ।
Thank You Lilly for comments,
Arts do not have any language itself, but this course will be available soon in Hindi and English also.
Dhirajhanpude69@gmail.comya email var sarve lesson milel ka
नमस्कार धीरज,
प्रसिद्ध झालेले 15 लेसन्स ब्लॉगवर आहेत. पुढचे लेसन्स दर रविवारी क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत.
नमस्कार सर…
तुमचे पाहिल्यान्दा आभार मानतो की तुम्ही खुप छान उपक्रम राबवत आहात. मला ग्राफीक डिजाइन शिकण्याची खुप इच्छा आहे.
कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
खूप सोपे आहे. तुम्ही सुरुवात करा. पहिले पंधरा लेसन्स वाचून त्याप्रमाणे प्रॅक्टिकल करा.
मी आपणास काही वर्षापुर्वी शिकणेसाठी पञव्यवहार आणि संपर्क केला होता आठवतय का आपला लोगो पाहुन चिञ पाहुन मला आठवले
हो, आठवतंय, कसे आहात? अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर पुण्यात फक्त २० विद्यार्थ्यांची एक प्रोफेशनल बॅच सुरु करतोय. तुम्ही भेटू शकता.
Nice lesson..
Thank you, Kishor
Nice message… Thank you…
Thank You…