एखादी गोष्ट मला समजते कि नाही, ते मला जाणवत असते. कधी मला ती गोष्ट समजली आहे असे वाटत असते, पण ती समजली नव्हती हे नंतर कळते. कधी सध्या सध्या गोष्टी समजून घेणे कमीपणाचे वाटते. तर कधी ती गोष्ट समजायला खूप काही अवघड नाही, असा समज करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कधी पुन्हा बघू म्हणून टाळाटाळ होते. पण त्या गोष्टीचा किंवा त्या विषयाचा पाठपुरावा करून समजून घेणारे खूप कमी असतात. तात्पर्य इथे आपल्याला ऑब्जेक्ट समजून घ्यायचा आहे. आपण इतके दिवस झाले ऑब्जेक्टच्या पाठीमागे लागलोय, तो ऑब्जेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण एक ऑब्जेक्ट समजला कि पुढे सारे सोपेच आहे. त्या ऑब्जेक्टलाच आपण खेळवत बसायचे आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे काहीतरी फील केलेल्या अनेक ऑब्जेक्ट्सची मांडणी असते. हे बोलायला, सांगायला खूप सोपे आहे, पण जेंव्हा करून दाखविण्याची वेळ येते तेंव्हा तारांबळ होते. म्हणून माझा आग्रह असतो कि ऑब्जेक्ट नीट समजून घ्या.
मागच्या भागात आपण फील आणि आऊटलाईनच्या संदर्भात ऑब्जेक्ट कसा असू शकतो ते पहिले आणि 1. युनिफॉर्म आणि 2. फौंटन फीलचा अभ्यास केला. आज फीलमधीलच त्यानंतरचे काही प्रकार पाहू.
3. ऑब्जेक्टमध्ये पॅटर्न फील करणे : (Pattern Fill)
पॅटर्न म्हणजे डिझाईन केलेला छोट्या आकाराचा तुकडा. एकाच डिझाईनचे असे अनेक तुकडे जवळ जवळ ठेऊन डिझाईन करण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. मग ते चित्र असो किंवा शिल्प. एकाच डिझाईनचे अनेक तुकडे एका ओळीत आडवे आणि उभे ठेऊन एक डिझाईन बनते. तेच पॅटर्न फील. त्याला नक्षी असेही म्हणतात. कितीही अॅडव्हान्स डिझाईनचे सॉफ्टवेअर असले तरी ते जुन्या कल्पना घेऊनच तयार केलेले असते, हे विशेष. जुन्या कल्पनेचे नवे रूप. चला करून पाहू.
एक रॅक्टँगल ड्रॉ करा. टूल बॉक्समधील Fill tool वर क्लिक करून Pattern Fill सिलेक्ट करा. पॅटर्न फील डायलॉग बॉक्स ओपन होईल. (चित्र 14.01)
पॅटर्न फील डायलॉग बॉक्समध्ये 2 Color, Full color आणि Bitmap असे तीन प्रकारचे पॅटर्न फील ऑप्शन्स दिसतील. अगोदरच सिलेक्ट असलेल्या 2 Color पॅटर्न फील ऑप्शन्सच्या बाजूला असलेल्या Front आणि Back कलरवर क्लिक करून दोन वेगळे कलर्स निवडा. तिथेच खाली Size मध्ये पॅटर्नची Width आणि Height ठरवा, आणि आजू-बाजूला न पाहता OK बटन दाबा. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये निवडलेल्या दोन कलरचा पॅटर्न फील होईल. पॅटर्न फील डायलॉग बॉक्समधील थंबनेलवर (पॅटर्नचा छोटा नमुना) क्लिक करून त्यामधील वेगवेगळे पॅटर्नचे नमुने निवडून तुम्ही वापरून पाहा.
याच पद्धतीने तुम्ही पॅटर्न फील डायलॉग बॉक्समधील Full color आणि Bitmap पॅटर्न फील सिलेक्ट करून ते दुसऱ्या दोन ऑब्जेक्ट्समध्ये फील करा. (चित्र 14.02 आणि 14.03)
तसेच त्या डायलॉग बॉक्समधील पॅटर्न फील थंबनेलवर क्लिक करून त्यामधील Full color आणि Bitmap पॅटर्न फीलचे वेगवेगळे नमुने निवडूनही तुम्ही वापरून पाहा. Full color आणि Bitmap पॅटर्न फीलमध्ये कलर्स बदलता येत नाहीत. मात्र ते कसे बदलतात, आपणास हवा तसा नवीन पॅटर्न कसा तयार करतात तसेच पॅटर्न फील डायलॉग बॉक्समधील इतर ऑप्शन्स आपण नंतर शिकणार आहोत. कारण ग्राफिक डिझाईनसाठी आणखी काही महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर पॅटर्न फील डायलॉग बॉक्समधील असे इतर ऑप्शन्स तुम्हाला सहजपणे समजतील.
4. ऑब्जेक्टमध्ये टेक्श्चर फील करणे : (Texture Fill)
कोणत्याही खरबरीत पृष्ठभागावर पेपर ठेऊन पेन्सिलने घासल्यास पेपरवर त्या खरबरीत पृष्ठभागाचे टेक्श्चर उमटते. एखाद्या नॅचरल खरबरीत पृष्ठभागाचा फोटो काढून तो डिझाईनच्या बॅकग्राऊंडला वापरण्याची पद्धत जुनीच आहे. दगड, विटा, माती, वाळू, सिमेंटच्या भिंती, गोनपाट, झाडाचा बुंधा, कापलेले लाकूड, फरशी अशा शेकडो गोष्टींचे टेक्श्चर डिझाईनसाठी वापरता येते. हीच जुनी पद्धत नव्या रुपात Texture Fill नावाने वापरतात. आपण करून पाहू.
एक रॅक्टँगल ड्रॉ करा. सिलेक्ट करा. टूल बॉक्समधील Fill tool वर क्लिक करून Texture Fill सिलेक्ट करा. टेक्श्चर फील डायलॉग बॉक्स ओपन होईल. Texture Library मधून Samples सिलेक्ट करा. त्याखालीच Texture list: मधून कोणताही एक टेक्श्चर प्रकार सिलेक्ट करा. Light आणि Shade Surface कलर निवडा, फारतर Preview वर क्लिक करून पाहा आणि OK बटन दाबा. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये निवडलेले टेक्श्चर फील होईल. (चित्र 14.04)
Texture Library च्या विविध Samples मधून वेगवेगळे टेक्श्चर प्रकार वापरून पाहा. अभ्यास म्हणून त्याची स्वतंत्र फाईल तयार करा. Texture नावाने ती सेव करून ठेवा. पुढे नक्की या फाईलचा उपयोग होईल. टेक्श्चर फील डायलॉग बॉक्समधील इतर ऑप्शन्स पुढे गरज लागेल तसे शिकू. फोटो शॉपमधील टेक्श्चर इफेक्ट्स शिकल्यावर कदाचित तुम्हाला इथल्या टेक्श्चरची गरज भासणार नाही. पण इथले टेक्श्चरसुद्धा फोटोशॉपमध्ये कल्पकतेने वापरता येऊ शकते. पुढे साऱ्या गोष्टी आपणास शिकायच्या आहेत. आज एवढे पुरे आहे.
5. पोस्ट स्क्रिप्ट टेक्श्चर फील : (PostScript Texture Fill)
एक रॅक्टँगल ड्रॉ करा. सिलेक्ट करा. टूल बॉक्समधील Fill tool वर क्लिक करून PostScript Fill सिलेक्ट करा. PostScript Texture डायलॉग बॉक्स ओपन होईल. लिस्टमधून एखादे टेक्श्चर सिलेक्ट करा. Preview fill सिलेक्ट करा म्हणजे टेक्श्चर कसे आहे ते कळेल. आणि OK करा. सिलेक्ट केलेले पोस्ट स्क्रिप्ट टेक्श्चर ऑब्जेक्टमध्ये फील होईल. (चित्र 14.05)
PostScript Texture डायलॉग बॉक्समधील इतर टेक्श्चर्स पॅरामिटर्स बदलून वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्समध्ये फील करून पाहा.
ग्राफिक डिझाईन मधील PostScript संकल्पना ही प्रिंट टेक्नॉलॉजीमध्ये खूप महत्वाची आहे. वेब डिझाईन मध्येही आपणास ही संकल्पना वापरता येते. इथल्या पोस्ट स्क्रिप्ट टेक्श्चर फील ऑप्शनमध्ये वापरलेली संकल्पना ही प्राथमिक आहे, आणि PostScript Texture Fill वापरल्याने फाईलचा साईजही वाढतो त्यामुळे असे टेक्श्चर वापरण्याच्या इतर पद्धती तसेच ग्राफिक डिझाईनमधील अॅडव्हान्स पोस्ट स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी आपण तपशीलवार डिझाईन आर्टवर्क करताना शिकणार आहोत.
6. कलर : (Color)
ऑब्जेक्टमध्ये युनिफॉर्म कलर फील करणे आणि आउटलाईनचा कलर बदलण्यासाठी ही Color Docker विंडो वापरतात. करून पाहा.
Fill tool मधील Color वर क्लिक करा. Color Docker विंडो ओपन होईल. ही Color Docker विंडो ओपन ठेऊनच तुम्ही एक ऑब्जेक्ट ड्रॉ करा. ड्रॉ केलेल्या ऑब्जेक्टमध्ये युनिफॉर्म कलर फील करायचा असेल तर ऑब्जेक्ट सिलेक्ट करून Color Docker विंडोमधील कलर निवडून Fill बटनवर क्लिक करा. निवडलेला कलर सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये फील होईल आणि सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या आउटलाईनचा कलर बदलायचा असेल तर Color Docker विंडोमधील कलर निवडून Outline बटनवर क्लिक करा. सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या आउटलाईनला निवडलेला कलर अॅप्लाय होईल. (चित्र 14.06)
एक गोष्ट लक्षात घ्या कि सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये कोणता युनिफॉर्म कलर आहे किंवा सिलेक्ट केलेल्या ऑब्जेक्टच्या आउटलाईनचा कलर कोणता ह्या गोष्टी Color Docker विंडोमध्ये कळत नाहीत, म्हणून या Color Docker विंडोचा वापर फार हुशारीने करावा लागतो.
ऑब्जेक्टमध्ये फिलचे प्रकार पाहिल्यानंतर आता पुन्हा आपण आउटलाईनकडे वळणार आहोत.
आउटलाईन : (Outline)
फील आणि आउटलाईनच्या संदर्भात ऑब्जेक्ट फक्त चार प्रकारचा असू शकतो हे आपण मागे पाहिले. जसे ऑब्जेक्टमध्ये विविध प्रकारचे फील करता येतात, त्याचप्रमाणे ऑब्जेक्टची आउटलाईन विविध प्रकारे बदलता येते. हेही तितकेच महत्वाचे आहे. मास्टर ग्राफिक डिझाईन मध्ये आउटलाईन वापरायची नसते हे जरी खरे असले तरी प्रत्येक डिझाईन हे मास्टर डिझाईन असलेच पाहिजे असे नसते, आणि तशी त्या डिझाईनची गरजही नसते. डिझाईनमध्ये चुकीच्या पद्धतीने आउटलाईन वापरली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून योग्य प्रकारे आउटलाईन वापरण्यासाठी काही गोष्टी आपण समजून घेऊ.
दोन किंवा अधिक लाईन्सपासून शेप बनतो त्यालाच आपण ऑब्जेक्टही म्हणतो. पूर्ण शेपचा कोणताही एक नोड हा त्या दोन लाईन्सशी बांधील असतो. तो नोड म्हणजे त्या शेपचा एक कॉर्नर असतो. जेंव्हा एखादी रेषा एका नोडपासून वळते तेंव्हा तिथे कॉर्नर बनतो. तो कॉर्नर कसा दिसतो हा डिझाईनमधील परफेक्शनच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय आहे. आपण ज्या पेनने शेप ड्रॉ करतो त्या शेपच्या आउटलाईन्स आणि कॉर्नर्स हे त्या पेनच्या टोकाच्या आकारानुसार (Nib Shape) दिसतात. पेनच्या टोकाच्या आकाराला Nib Shape म्हणतात. निबचा आकार चौकोनी, वर्तुळाकार किंवा उभट / आडवा / तिरका असेल तर त्या शेपच्या आउटलाईन्स आणि कॉर्नर्स वेगवेगळे दिसतात. चला प्रत्यक्ष करुनच पाहू.
1. ऑब्जेक्टच्या आउटलाईनचा कलर, आउटलाईनची जाडी, निब शेप, कॉर्नर्स आणि लाईन कॅप्स : (Outline Color, Width, Nib Shape, Corners and Line Caps)
ह्या पाचही प्रकारांचा वेगवेगळा अभ्यास करण्यापेक्षा एकाच वेळी दोन / तीन ऑब्जेक्टशी तुलना करून अभ्यास करू म्हणजे ते समजण्यास सोपे होईल. (चित्र 14.07)
एक रॅक्टँगल ड्रॉ करा. सिलेक्ट करा. टूल बॉक्स मधील Outline Pen वर क्लिक करून पुन्हा Outline Pen सिलेक्ट करा. Outline Pen डायलॉग बॉक्स ओपन होईल. Color ब्लॅक तसाच ठेवा किंवा तुम्हाला वेगळा हवा असेल तर बदला. Width 10 mm ठेवा. आणि OK करा. रॅक्टँगलच्या आउटलाईनची जाडी (Width) 10 mm झाली. आता त्या रॅक्टँगलचे डुप्लिकेट दोन रॅक्टँगल करा. तीन रॅक्टँगल्सना अनुक्रमे A, B आणि C अशी नावे द्या. आता ऑब्जेक्ट B सिलेक्ट करा. आउटलाईन पेन डायलॉग बॉक्स ओपन करा. Corners ऑप्शनखालील दोन नंबरचा राऊंड कॉर्नर ऑप्शन सिलेक्ट करा. निब शेप चौकोनाचा वर्तुळाकार झालेला दिसेल. OK करा. ऑब्जेक्ट B चे कॉर्नर्स राऊंड झालेले दिसतील. शेवटी ऑब्जेक्ट C सिलेक्ट करून आउटलाईन पेन डायलॉग बॉक्समधील Corners ऑप्शन्सखालील तिसरा ऑप्शन सिलेक्ट करा. तीनही ऑब्जेक्ट्सच्या कॉर्नर्समधील फरक पाहा.
आता फ्री हँड टूलने चित्र 14.07 मध्ये दाखवल्याप्रमाणे XYZ असा एक अँगल ड्रॉ करा. Outline Pen ने त्याच्याही आउटलाईनची जाडी (Width) 10 mm करा आणि त्याचे डुप्लिकेट दोन ऑब्जेक्ट करा. तीन कोनांना अनुक्रमे D, E आणि F अशी नावे द्या. कोनाला दोन लाईन्स जोडलेला एकच कॉर्नर असतो. बाकी दोन नोड्सची टोके ओपन असतात. दोन किंवा अधिक नोड्स असलेल्या कोणत्याही रेषेच्या दोन्ही ओपन टोकांना लाईन कॅप्स (Line caps) म्हणतात. आता कोन E सिलेक्ट करा. Outline Pen डायलॉग बॉक्समधील Corners ऑप्शनखालील नंबर दोनचा राऊंड कॉर्नर ऑप्शन आणि Laine caps ऑप्शनखालीलही नंबर दोनचा राऊंड कॅप्स ऑप्शन सिलेक्ट करा. ऑब्जेक्ट D आणि E च्या कॉर्नर्स आणि कॅप्समधील फरक लक्षात घ्या. शेवटी ऑब्जेक्ट F सिलेक्ट करून Outline Pen डायलॉग बॉक्समधील Corners ऑप्शनखालील नंबर तीनचा स्क्वेअर कॉर्नर ऑप्शन आणि Laine caps ऑप्शनखालीलही नंबर तीनचा स्क्वेअर कॅप्स ऑप्शन सिलेक्ट करा. तीनही कोनांचे कॉर्नर्स आणि लाईन कॅप्समधील फरकाचे निरीक्षण करा.
जाता जाता आउटलाईनची जाडी (Width) पाहा. ती त्या शेपच्या कडेपासून आत आणि बाहेर दोन्ही बाजूला वाढलेली असते. इलस्ट्रेटर / फोटोशॉपमध्ये आउटलाईनला स्ट्रोक (Stroke) म्हणतात आणि तिकडे आउटलाईनची जाडी (Width) शेपच्या कडेपासून सेंटर, आत किंवा बाहेर कुठे पाहिजे ते ठरवता येते. कोरल ड्रॉमध्ये ही सोय X6 पर्यंत तरी नाही. पुढच्या व्हर्जन मध्ये सुधारणा झाली तर स्वागत आहे. तुमच्याकडे उत्तम लॉजिक असेल तर बिघडत कुठेच नाही. असो,
Outline Pen डायलॉग बॉक्समधील ऑब्जेक्टच्या आउटलाईनचा कलर, आउटलाईनची जाडी, निब शेप, कॉर्नर्स आणि लाईन कॅप्स आदी ऑप्शन्स आज आपण पाहिले. पुढच्या लेसनमध्ये Outline Pen मधीलच डिझाईनच्या दृष्टीकोनातून आणखी काही महत्वाचे ऑप्शन्स आणि फील आणि आउटलाईनशी संबंधित इतर उपयुक्त गोष्टींची चर्चा करू.
आजचा लेसन तुम्हाला आवडला / पटला तर लाईक करा आणि संबंधित मित्रांशी शेअर करा. तुम्हाला ग्राफिक डिझाईन सुरुवातीपासून शिकायचे असेल तर आजच Subscribe करा. म्हणजे पुढचा लेसन पोस्ट केल्यावर ईमेलने मी त्याची तुम्हाला कल्पना देईन. आपला अभिप्राय, आपली मते, आपले विचार आपल्या अपेक्षा, प्रश्न किंवा सूचना मला तुम्ही केंव्हाही ईमेल किंवा Whatsapp करू शकता. माझा ईमेल आयडी आहे gd@artekdigital.in आणि माझा Whatsapp नंबर आहे 9975769299.

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉग आणि YouTube चॅनलच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांसाठी ते आता लवकरच ऑनलाईन कोर्सेस सुरु करीत आहेत. ऑनलाईन मोफत डेमो कोर्ससाठी येथे क्लिक करा.