ग्राफिक डिझाईन एवढं सोपं कसं असू शकतं?

जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईन : सेमिनार 24 डिसेंबर 2017

ग्राफिक डिझाईन ही सहज समजण्यासारखी एक अत्यंत सोपी आणि साधी संकल्पना आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे फार काहीतरी वेगळे आहे. अद्भुत आहे, अवघड आहे असे मुळीच नाही. इंटरनेटच्या युगात जरी आता सारे एकदम सोपे आणि सुटसुटीत झाले असले तरीही गुंतागुंत वाढली आहे. कारण काय खरे, काय खोटे, कोणते बरोबर आणि कोणते चूक हे समजून घेताना संभ्रम होतो. ग्राफिक डिझाईनच्या बाबतीत असेच झाले आहे. जाहिरात आणि जाहिरातीच्या विविध माध्यमांमुळे ग्राफिक डिझाईनचे रोज नव-नवीन प्रकार पाहायला मिळतात. प्रमोशनसाठी प्रत्येक व्यावसायिकाला आज ग्राफिक डिझाईनची गरज आहे. त्यामुळे जसजसा उद्योग वाढतो आहे तसतसे ग्राफिक डिझाईनचे महत्व वाढतच आहे. ग्राफिक डिझाईनरला नेहमीच काहीतरी नवीन करावे लागते. माध्यमाला अनुसरून असे क्रिएटिव्ह आर्टवर्क बनविताना वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यामध्ये ऑफसेट प्रिंटिंगला डिझाईन आर्टवर्क करण्याची पद्धत वेगळी, बुक पब्लिकेशनसाठी आर्ट-वर्क करण्याची पद्धत वेगळी तसेच स्क्रिन प्रिंटिंगसाठी डिझाईन आर्टवर्क करण्याची पद्धत वेगळी असते. डिजिटल प्रिंटिंग, पॅकॅजिंगसाठी फ्लेक्झो किंवा रोटो-ग्रेव्हीयरसाठीही डिझाईन आर्टवर्क करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. इंटरनेटसाठी स्टॅटिक आणि डायनॅमिक वेब डिझाईन बनवताना तर HTML, CSS, JS, PHP, MySQL, अशा विविध प्रकारच्या प्रॉग्रॅमिंग माध्यमातून जावे लागते. रिस्पॉन्सिव्ह वेबसाईटसाठी पुन्हा बूट-स्ट्रॅप सारख्या प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागतो. ब्लॉगिंगसाठी कधी ब्लॉगर तर कधी वर्ड-प्रेस वापरावे लागते. ऑनलाईन जाहिरातीसाठी डिझाईन्स बनविणे हा पुन्हा वेगळा प्रकार असतो. फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर आदी सोशल नेट्वर्किंग प्रमोशनसाठी पेज डिझाइन्स बनविणे हीसुद्धा एक कसरत असते. अशा अनेक प्रकारच्या ग्राफिक डिझाईनची कामे करताना ग्राफिक डिझाईनरला वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरावी लागतात. मग कोणत्या कामासाठी नेमके कोणते सॉफ्टवेअर वापरायचे? हा पुन्हा कधी कधी पेचात टाकणारा प्रश्न असतो. ग्राफिक डिझाईनची व्याप्ती आणि ग्राफिक डिझाईनरच्या कामाची लिस्ट अजूनही खूप मोठी आहे. इथे एका वेळी ते सर्व सांगणे शक्य नाही.

आता तुम्ही म्हणाल हे सारे एकटा ग्राफिक डिझाईनर कसा काय करू शकेल? खरंय. ही सारी कामे एका ग्राफिक डिझाईनरला करण्याची गरजच लागत नाही. कारण जेंव्हा एखादा ग्राफिक डिझाईनर एका ठराविक प्रकारचे काम करतो तेंव्हा त्याच प्रकारची कामे तो नेहमी करतो आणि त्याचा व्यवसाय सुरु होतो. गरजेनुसार किंवा आवडीनुसार तो बाकीच्या गोष्टी हळू हळू शिकतो किंवा सुरु असलेल्या कामातून त्याला दुसरे शिकायला वेळच मिळत नाही. अनेक माध्यमे, अनेक डिझाईन्सचे प्रकार, डिझाईन करण्याच्या अनेक पद्धती तरीही ग्राफिक डिझाईन ही एक अत्यंत सोपी आणि साधी संकल्पना कशी आहे आणि तुम्हीसुद्धा ग्राफिक डिझाईनर कसे बनू शकता हे जाणून घेण्यासाठीच या परिसंवादाचे आयोजन आहे.

तुम्हाला ड्रॉइंगची आवड असेल आणि या क्षेत्रात यायची इच्छा असेल. तुम्ही आर्टिस्ट असाल, तुम्ही फोटोग्राफर असाल, प्रिंटर असाल, जाहिरातदार असाल आणि ग्राफिक डिझाईनबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल. किंवा तुम्ही ग्राफिक डिझाईनर असाल आणि ग्राफिक डिझाईनविषयी काही शंका असतील. तर हा परिसंवाद आपल्यासाठीच आहे. हा परिसंवाद अशा सर्वांसाठीच आहे कि ज्यांना नवीन नवीन शिकायला आवडतं. जाणून घ्यायला आवडतं. जाहिरात, प्रिंटिंग आणि वेब मधील ग्राफिक डिझाईन सोपं कसं असतं हे सांगणारा हा परिसंवाद आहे. अगदी कुणालाही समजणारा हा मराठी परिसंवाद आहे. सहभागासाठी ना वयाची अट, ना शिक्षणाची अट, ना पात्रतेची अट. कारण ग्राफिक डिझाईन ही सहज समजण्यासारखी एक अत्यंत सोपी आणि साधी संकल्पना आहे.
मर्यादित सीट्स असल्याने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच रजिस्टर करा.

Registrations are closed for this event


प्रवेश शुल्क रु. 2000/-
Payment Options

Office :
ARTEK DIGITAL
Halward Business Center, Shamal Appt. 1st Floor,
ITI Road, Near Crossword, Aundh, Pune -411007
Mobile : 9975769299, Email : gd@artekdigital.in

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉगच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांनी  मोफत मार्गदर्शनासाठी  त्यांना अवश्य भेटावे. फोन : 99 75 76 92 99.

Leave a Reply