ग्राफिक डिझाईन : एक दिवसीय परिसंवाद 24 डिसेंबर 2017

‘ग्राफिक डिझाईन’ विषयावरील पहिला परिपूर्ण मराठी परिसंवाद.

Registrations are closed for this event

ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ?

ग्राफिक डिझाईन म्हणजे कमर्शिअल आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे फाईन आर्ट, ग्राफिक डिझाईन म्हणजे कम्युनिकेशन आर्ट आणि ग्राफिक डिझाईन म्हणजेच अप्लाईड आर्ट. टूडी / थ्रीडी अॅनिमेशन म्हणजे हालतं बोलतं ग्राफिक डिझाईन आणि त्या अॅनिमेशनमधील प्रत्येक फ्रेम म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. कॉम्प्युटर आणि इंटरनेट नव्हते तेंव्हाही ग्राफिक डिझाईन होतंच. पेन्सिलने कोऱ्या पेपरवर ड्रॉ केलेली एक रेष किंवा ड्रॉ केलेला एक आकार आणि त्या आकारात रंग भरून काढलेले एक चित्र म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते. एखाद्या आर्टिस्टने कॅनव्हासवर तैलरंगात केलेले पेंटिंग किंवा फोटोग्राफरने काढलेला फोटो म्हणजे सुद्धा ग्राफिक डिझाईनच असते. आत्ताच्या इंटरनेट युगातील युझर इंटरफेस (UI) आणि युझर एक्स्पेरियन्स (UX) डिझाईन ज्याचा खूप गाजावाजा चाललाय तेही ग्राफिक डिझाईनच असते. थोडक्यात ज्याद्वारे एखादा संदेश दिला जातो अशी कोणतीही कलाकृती म्हणजे ग्राफिक डिझाईन. काळानुसार बदलेली संदेशवहनाची माध्यमे आणि त्या मध्यामानुरूप अर्थ समजण्याच्या दृष्टीने शब्द बदलले पण या साऱ्या शब्दांपाठीमागील मतितार्थ आणि संकल्पना एकच आहे, आणि ती म्हणजे ‘ग्राफिक डिझाईन’. तेंव्हा ग्राफिक डिझाईनच्या विविध नावांमुळे आणि विविध माध्यमांमुळे गोंधळून जायचे कारण नाही.
तुम्ही विचार करू शकत असाल, कधीतरी पेन्सीलने कागदावर काहीतरी ड्रॉ केले असेल, लिहिले असेल आणि जर रेड, ग्रीन, ब्लू, येलो, ऑरेंज, आदी कलर्स तुम्हाला ओळखता येत असतील तर तुम्ही परफेक्ट ग्राफिक डिझाईनर बनू शकता. स्वत:चा व्यवसाय सुरु करू शकता.

ग्राफिक डिझाईन – एक व्यावसायिक गरज :

कोणत्याही व्यवसायाच्या / प्रोडक्टच्या अॅडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी अनेक प्रकारची ग्राफिक डिझाइन्स बनवावी लागतात. त्याला ब्रँडिंग असे म्हणतात. त्यामध्ये लोगो डिझाईन, कार्पोरेट आय.डी., स्टेशनरी, ब्रोशर, कॅटलॉग डिझाईन, फोटोग्राफी, ईमेज एडिटिंग, स्टिकर, पोस्टर, होर्डिंग डिझाईन, बॉक्स पॅकॅजिंग, पौच पॅकॅजिंग, न्यूज पेपर अॅड, मॅगॅझिन अॅड, तसेच वेबसाईट डिझाईन, ब्लॉग डिझाईन, ईमेल मार्केटिंगसाठी ईमेल डिझाईन, सोशल नेटवर्क मार्केटिंगमध्ये फेसबुक, जी प्लस, ट्विटर, लिंक्ड इन आदी पोस्टसाठी ग्राफिक डिझाईन, युट्युब चॅनलसाठी ग्राफिक व्हिडीओ आदी अनेक गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी समजून घेऊन जो डिझाईन करतो तो ‘ग्राफिक डिझाईनर’.

ग्राफिक डिझाईनमधील करिअर आणि प्रचलित शिक्षण :

करीयरच्या दृष्टीने जेंव्हा ग्राफिक डिझाईनचा विचार केला जातो तेंव्हा ग्राफिक डिझाईनमध्ये नेमके काय शिकायचे आणि शिकायला सुरुवात कोठून करायची हा प्रश्न पडतोच. ग्राफिक डिझाईन हा खूप मोठा आणि विस्तृत विषय आहे. म्हटले तर हा तसा खूप अवघड आणि समजून घेतला तर एकदम सोपा विषय आहे. ग्राफिक डिझाईनचे विविध प्रकार पाहिले कि त्याचे मूळ रूप नेमके कसे आहे ते कळत नाही. ग्राफिक डिझाईनमध्ये जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब डिझाईन, अॅनिमेशन आणि या प्रत्येकामध्ये परत बरेच उपप्रकार पडतात. त्यापैकी कोणत्याही एका विषयात स्पेशलायझेशन करून करियरला संधी असते. ग्राफिक डिझाईन कुणी शिकावं? ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी काय पात्रता हवी? ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी चित्रकलेची गरज आहे का? ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर काय? या व अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे हवी असतात. कोर्सला भरलेल्या फीच्या बदल्यात विद्यार्थ्याला काय मिळते? नुसते सर्टिफिकेट म्हणजे ज्ञानाची पावती नव्हे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली शिक्षण पद्धती. डिप्लोमा / डिग्रीचे सर्टिफिकेट म्हणजे ज्ञानाची पातळी समजली जाते. पण सत्य परिस्थिती पाहिली तर त्या डिप्लोमा / डिग्री सर्टिफिकेटचा आणि ज्ञानाचा दुरान्वये कुठेच संबंध दिसत नाही. शिक्षण ज्ञान मिळविण्यासाठी आहे कि सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कळत नाही. अभ्यास पास होण्यासाठी आणि सर्टिफिकेट नोकरी मिळण्यासाठीच मिळवायचे असे जणू समीकरणच झाले आहे. मात्र व्यवसाय करावा असे फार कमी विद्यार्थ्यांना वाटते. असे मुळीच नाही कि व्यवसाय डिप्लोमा / डिग्री झाल्यानंतरच करता येतो. नोकरीसाठी डिप्लोमा / डिग्री ठीक आहे. पण व्यवसाय करण्यासाठी प्रॅक्टिकल व्यावसायिक ज्ञानाची गरज असते. आणि हेच आम्ही या परिसंवाद, वर्कशॉप्स आणि शॉर्टटर्म कोर्सेसच्या माध्यमातून देत आहोत.

कोणत्याही शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रचलित थेअरीबाज शिक्षण कुचकामी ठरले आहे. एक गोष्ट दहा वेळा वाचून पाठ करण्यापेक्षा ती गोष्ट एकदा प्रत्यक्ष करून पाहिली कि जास्त समजते. म्हणून आम्ही म्हणतो वाचून पाठ करण्यापेक्षा प्रत्यक्ष करून बघा. प्रचलित थेअरीबाज शिक्षण म्हणजे पुस्तक वाचून पोहायला शिकल्यासारखे किंवा एखाद्या खाद्यपदार्थाचे वर्णन वाचून पोट भरल्यासारखे आहे. म्हणून आम्ही १०० टक्के प्रॅक्टिकलला महत्व देतो.

१०० टक्के ज्ञानाची हमी :

१०० टक्के नोकरीची हमी ही एक खूप आकर्षक पण बुद्धीला न पटणारी संकल्पना कशी रूढ झाली आहे माहित नाही. खरे तर १०० टक्के ज्ञानाची हमी पाहिजे. कारण १०० टक्के ज्ञान असेल तर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय काहीही करू शकता. म्हणून शिकणाऱ्याने १०० टक्के नोकरीच्या अमिषाला बळी न पडता १०० टक्के ज्ञानाची हमी मागितली पाहिजे.

हा परिसंवाद कोणासाठी?

ज्यांना ग्राफिक डिझाईन जाणून घ्यायचं आहे अशा सर्वांसाठी हा परिसंवाद आहे. हा परिसंवाद जाहिरातदार, फोटोग्राफर्स, प्रिंटर्स, कलाशिक्षक, आर्ट स्कूल स्टुडंट्स, व्यावसायिक, नोकरदार, डिप्लोमा / डिग्री होल्डर आणि ग्राफिक डिझाईनमधील नवोदित व्यावसायिकांसाठी आहेच शिवाय अशा सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त आहे कि ज्यांना जाहिरात, प्रिंटिंग आणि वेब क्षेत्रात ग्राफिक डिझाईनर बनायचे आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे.

ग्राफिक डिझाईन आणि सॉफ्टवेअर्स :

ग्राफिक डिझाईनसाठी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत त्यात प्रामुख्याने कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, इनडिझाईन आदींचा समावेश होतो, प्रिंट डिझाईनशिवाय ग्राफिक डिझाईनरला वेब डिझाईन करण्यासाठी HTML, CSS, PHP, जावा स्क्रिप्ट आदी विषय शिकावे लागतात. त्यानंतर  डिजिटल मार्केटिंगसाठी सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉगिंगचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. हे सारे पाहिल्यावर सुरुवात नेमकी कोठून करायची? सुरुवातीला काय शिकले पाहिजे? नंतर काय शिकले पाहिजे? या साऱ्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे.

ग्राफिक डिझाईन आणि इंटरनेट :

इंटरनेटवर ग्राफिक डिझाईनबद्दल इंग्रजीमध्ये खूप काही वाचायला मिळतं, खूप काही मोफत  शिकायला मिळतं आणि नवनवीन संकल्पना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ग्राफिक डिझाईन करताना इंटरनेटचा रेफरन्ससाठी खूपच उपयोग होतो. इंटरनेटमुळे ग्राफिक डिझाईनर बनणे अधिक सोपे झाले आहे. बहुतांश कोर्सेसच्या नोटस आणि व्हिडीओज इंटरनेटवरूनच डाउनलोड करून विद्यार्थ्याला दिल्या जातात. इंटरनेट म्हणजे कोणताही विषय शिकण्याचे उघड गुपित आहे. इंटरनेट सर्वांनाच माहित आहे. त्याचा उपयोग ग्राफिक डिझाईनसाठी कसा होतो तेही आपण या सेमिनारमध्ये थोडक्यात पाहणार आहोत.

एक दिवसाच्या या परिसंवादामधून ग्राफिक डिझाईनविषयी तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन नक्कीच होईल. तेंव्हा ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी जरूर या. हा परिसंवाद ग्राफिक डिझाईनर बनण्याच्या दृष्टीने नक्कीच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. मर्यादित सीट्स असल्याने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच रजिस्टर करा.

प्रवेश शुल्क रु. 2000/-
Payment Options

या ब्लॉगचे लेखक भागवत पवार हे ग्राफिक डिझाईनर असून जाहिरात, प्रिंटिंग आणि वेबमधील ग्राफिक डिझाईनचा त्यांना 25 वर्षाहून अधिक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यांनी डिझाईन केलेला ‘ग्राफिक डिझाईन स्किल्स’ कोर्स करून आजअखेर शेकडो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केलेत. त्याच कोर्समधील लेसन्स या ब्लॉगच्या माध्यमातून ते क्रमशः प्रसिद्ध करीत आहे. प्रिंट ग्राफिक्स आणि वेब डिझाईनमध्ये करियर करु इच्छिणाऱ्यांनी  मोफत मार्गदर्शनासाठी  त्यांना अवश्य भेटावे. फोन : 99 75 76 92 99.

Leave a Reply