Events and Workshops

Intro About Seminars : कोरल ड्रॉ / इलस्ट्रेटर आणि फोटोशॉप ही ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी वापरण्यात येणारी टूल्स आहेत. तसा ग्राफिक डिझाईन हा खूप मोठा आणि स्वतंत्र विषय आहे. वेब डिझाईन हासुद्धा ग्राफिक डिझाईनचाच एक विषय आहे. कमर्शिअल आर्टमध्ये ग्राफिक डिझाईन हा मुख्य विषय असतो. कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इलस्ट्रेटर आदी सॉफ्टवेअरमध्ये बिझिनेस प्रमोशनसाठी कोणतेही आर्टवर्क बनविताना सॉफ्ट स्किल्सशिवाय आणखी एक गोष्ट लागते. ती म्हणजे ‘कल्पना शक्ती’. म्हणजे विषयाला अनुसरून विचार करायचा आणि एक मध्यवर्ती कल्पना / थीम फायनल करायची. त्यानंतर दोन किंवा अधिक सॉफ्टवेअर्स एकत्रित वापरून ती कल्पना दृश्य रूपात आणायची. हे करण्यासाठी ज्या क्रमाने आर्टवर्क बनते तो क्रम कसा असतो आणि कल्पना शक्तीला चालना देणारा ‘एक दिवसात ग्राफिक डिझाईन’ हा परिसंवाद आहे. व्यावसायिक प्रमोशनसाठी डिजिटल आर्टची आवड असणारे विद्यार्थी तसेच संबंधित व्यावसायिकांना निर्माण होणाऱ्या शंकांचे समाधान करणारा हा परिसंवाद आहे. आजच रजिस्टर करा आणि आपला प्रवेश निश्चित करा.